राहाता शहरातील १२५ वर्षांपूर्वीची इमारत कोसळण्याच्या अवस्थेत ?

  34

राहाता : शहरातील नगरपरिषद हद्दीतील मिळकत क्रमांक ३०००६०१ मधील सुमारे १०० ते १२५ वर्षांपूर्वीची असलेली इमारतीची अवस्था अत्यंत वाईट झाल्याने सदरची इमारत केव्हाही कोसळू शकते परिणामी कुठलेही वाईट दुर्घटना घडू शकते त्यामुळे खबरदारी म्हणून नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ संबंधित मिळकत धारक यांना सदरची इमारत जमीन उध्वस्त करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच शहरातील इतर अनेक वर्षापासून जीर्ण झालेल्या बांधकामाची प्रशासनाने पाहणी करून संबंधित मिळकत धारकांना खबरदारीचे उपाय घेण्याबाबत सूचना द्याव्यात असे निवेदन शहरातील ग्रामस्थांनी मुख्याधिकारी वैभव लोंढे यांना दिले आहे.


मुख्याधिकारी लोंढे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राहाता शहरातील गावठाण हद्दीतील मिळकत क्रमांक ३०००६०१ व जुना ग्रामपंचायत मिळकत क्रमांक ७५४ मध्ये असलेले इमारतीचे बांधकाम जवळपास शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वीचे असल्याने सदरच्या इमारतीची अवस्था ही जीर्ण झाल्याने ही इमारत कुठल्याही क्षणी कोसळू शकते या ठिकाणी हनुमान मंदिर तसेच मज्जित असल्याने शहरातील मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येतात. तसेच हा परिसर वर्दळीच्या ठिकाणी असल्याने येथे नागरिक दैनंदिन कामासाठी रस्त्यावरून ये जा करत असतात. इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्यामुळे सध्याच्या पावसाळ्यात सदर इमारत केव्हाही कोसळू शकते परिणामी या इमारतीमुळे मोठी दुर्घटना घडू शकते.नगरपरिषदेने तात्काळ सदर इमारतीची पाहणी करून संबंधित मिळकत धारकाला सदर इमारत काढून टाकण्याच्या सूचना द्याव्यात तसेच शहरातील अनेक वर्षापासून जीर्ण झालेल्या बांधकामाची प्रशासनाने पाहणी करून संबंधित बांधकाम धारकांना खबरदारीचे उपाय घेण्याच्या सूचना द्याव्यत अशी मागणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष भाऊसाहेब सदाफळ, राहुल सदाफळ, सागर सदाफळ,जय आग्रे, सुरज गायकर, अँड रामनाथ सदाफळ, सागर बोठे, उत्तम बोठे, योगेश रुईकर, बबनराव गायकवाड व आदी शहरातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने