अबब! गडकरींच्या पत्नीच्या शेतात भले मोठे कांदे!

नागपूर : नागपूरच्या धापेवाडा परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 'भक्ती फार्म'वर सेंद्रिय शेतीचा एक आश्चर्यजनक आणि प्रेरणादायी प्रयोग घडून आला आहे. गडकरींच्या पत्नी कांचन गडकरी यांनी येथे सेंद्रिय कांद्याचं यशस्वी उत्पादन घेतलं असून या कांद्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वजन प्रत्येकी जवळपास ८०० ग्रॅम ते तब्बल १ किलो आहे.


या अनोख्या प्रयोगाबाबत माहिती देताना नितीन गडकरी यांनी स्वतः एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी कांद्याचे बियाणे कुठून आणले, कोणती शेती तंत्रज्ञान वापरली, आणि सेंद्रिय पद्धतीने उत्पादन कसं घेतलं याची सविस्तर माहिती दिली आहे.


या प्रयोगासाठी वापरण्यात आलेली कांद्याची बियाणं नेदरलँड्समधून आयात करण्यात आली होती. Seminis या कंपनीच्या बियांची २.५ किलोची बॅच एका एकर शेतात पेरण्यात आली. सुरुवातीला ४५ दिवसांची नर्सरी तयार करण्यात आली, त्यासाठी मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला आणि बायो-सेंद्रिय खतांनी जमीन समृद्ध करण्यात आली. पाणीपुरवठा अत्याधुनिक डबल ड्रिप इरिगेशन पद्धतीने करण्यात आला.



नर्सरीतून उगवलेल्या रोपांची लागवड त्यानंतर दुसऱ्या भागात करण्यात आली. एकूण २४,००० कांद्याच्या रोपांची लागवड करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान फक्त ७ ते १० टक्के रोपे नष्ट झाली, जे मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी तुलनेने खूपच कमी नुकसान मानलं जातं. शेवटी उत्पादन घेतल्यावर प्रत्येकी कांद्याचं वजन ४०० ग्रॅमपासून ते ८००-१००० ग्रॅमपर्यंत नोंदवलं गेलं.


गडकरी यांनी म्हटलं की, “या प्रक्रियेदरम्यान सर्व प्रकारची काळजी घेतली गेली. कोणीही सेंद्रिय शेती करू इच्छित असेल, तर आम्ही त्यांना पूर्ण मदत करण्यास तयार आहोत.” त्यांनी पुढे सांगितलं की या एक एकर जमीनीतून १२ ते १३ टन सेंद्रिय कांद्याचं उत्पादन मिळालं आहे.


हा सेंद्रिय शेतीचा प्रयोग आता शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण करत आहे. रासायनिक खतांवर अवलंबून राहण्याऐवजी पर्यायी नैसर्गिक पद्धतीने अधिक आणि दर्जेदार उत्पादन घेता येऊ शकतं, हे गडकरींच्या शेतातून पुन्हा सिद्ध झालं आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद