ठाण्यातून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक

  70

ठाणे : मुंबई जवळच्या ठाण्यातून पाकिस्तानच्या एका गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. भारतातली संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप अटक केलेल्या हेरावर आहे. या गुप्तहेराला महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे.

आरोपी मुंबईतील एका महत्त्वाच्या संस्थेसाठी काम करत होता आणि एका पाकिस्तानी एजंटने त्याला 'हनीट्रॅप'मध्ये अडकवले होते. पाकिस्तानी एजंटने फेसबुकवर महिला असल्याचे भासवून आरोपीशी मैत्री केली होती. आरोपीने नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत व्हॉट्सअॅपद्वारे एका 'पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणे'ला एका महत्त्वाच्या आस्थापनेबद्दलची संवेदनशील माहिती शेअर केली होती.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीआधारे एटीएसच्या ठाणे शाखेने आरोपीला इतर दोघांसह ताब्यात घेतले. सुरुवातीच्या चौकशीनंतर, त्या व्यक्तीला अधिकृत गुपित कायद्याच्या कलम ३ (जे हेरगिरीशी संबंधित आहे) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ६१ (२) (गुन्हेगारी कट) अंतर्गत अटक करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या इतर दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Comments
Add Comment

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला