‘सुरक्षित प्रवासासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान

उपमुख्यमंत्र्यांकडून एसटीच्या स्मार्ट बसची पाहणी


ठाणे : राज्य परिवहन महामंडळाच्या बस मधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे व्यक्त केला. एसटी महामंडळाच्या ठाणे-नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या 'स्मार्ट बस'मध्ये बसवण्यात आलेल्या आयटी सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी ठाणे येथे केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एसटीचे अधिकारी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सध्या दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या एसटी बसमधील प्रवास अधिकाधिक सुरक्षित झाला पाहिजे. या उद्देशाने एआय तंत्रज्ञानावर आधारित ‘एकात्मिक सुरक्षा प्रणाली’ नव्या बसेसमध्ये लावण्यात येणार आहे. चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धती पासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालीवर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या सोबतच वायफाय, एलईडी स्क्रीन, जीपीएस प्रणाली सह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसविण्यात येणार आहे.


या उपकरणामुळे महिलांना सुरक्षितरीत्या प्रवास करता येणे शक्य होणार असून, चालकाला गाडी चालवणे अधिक सोपे होणार आहे. तसेच त्याने मद्यपान केले असले किंवा त्याला झोप येत असली तरीही सायरनद्वारे लगेच कळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षितरीत्या प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. परिवहन मंत्री सरनाईक यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे ही प्रणाली बसविण्यात येत आहे. त्यांनी भविष्यातील बदलांचा विचार करून एसटीमध्ये आमुलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतला आहे, असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. परिवहन महामंडळाच्या या 'स्मार्ट बस'मध्ये प्रगत चालक सहाय्यक प्रणाली आणि चालक निरीक्षण कॅमेरे बसवण्यात आले आहेत.


तसेच ३६० अंशातील सर्व माहिती चालकाला देणारे ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये प्रवासी भागात दोन, समोर आणि पाठीमागे प्रत्येकी एक कॅमेरा बसवण्यात आला आहे. तसेच चालक सहाय्यक स्क्रीन, मोबाईल जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, एलसीडी स्क्रीन आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कार्यान्वित करण्यात
आलेली आहे.

Comments
Add Comment

एसी ऑफिस सोडून मातीच्या गोण्या उचलल्या!

मोखाडा गटविकास अधिकाऱ्यांचे जलसंधारणासाठी श्रमदान मोखाडा : सरकारी योजना केवळ कागदावर किंवा आदेशापुरत्या

तलावपाळीवर नववर्षाचे स्वागत गंगा आरतीने !

३१ डिसेंबरच्या रात्री कार्यक्रम; वाराणसीहून पंडितांना आमंत्रण ठाणे : ठाणे शहर येत्या नवीन वर्षाच्या

ठाण्यात भाजप-शिंदे गटात जागावाटपाच्या वाटाघाटी

भाजपची ५० जागांची मागणी ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप

अंबरनाथमध्ये २०८ बोगस मतदार !

भाजपचा शिवसेनेच्या शिंदे गटावर आरोप, पोलीस चौकशी सुरू अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान खळबळजनक

Mira-Bhayandar Leopard Attack : होणाऱ्या नवरीवर बिबट्याची झडप: चेहऱ्यावर गंभीर जखमा अन्…नेमकं काय घडलं त्या घरात? मीरा भाईंदर हादरलं!

मीरा भाईंदर : पुणे आणि नागपूरनंतर आता मुंबईलगतच्या मीरा भाईंदर शहरात बिबट्याच्या वावराने मोठी खळबळ उडाली आहे.

पुलाच्या कामामुळे कल्याणमध्ये वाहतूक मार्गात २० दिवस बदल , वालधुनी उड्डाणपुलावर काम सुरू

कल्याण : कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेला जोडणारा वालधुनी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ