रानमेवा विक्रेत्या महिलांना त्रास; आदिवासी सेनेचे आंदोलन

  37

इगतपुरी: पावसाळ्यापूर्वी निसर्गात बहरणाऱ्या रानभाज्या, रानमेवा, करवंदे विकुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी महिलांवर रेलसुरक्षा बलाकडून होणारा त्रास आणि दंडेलशाहीमुळे आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.


रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दि. ना. उघाडे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी रेल्वे स्थानकात निदर्शने करत मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी रेल प्रबंधक राऊत व संबंधीत प्रशासनास निवेदन देण्यात आले.


इगतपुरी तालुक्यात डोंगरकडे कपाऱ्यात राहुन निसर्गाने बहरलेल्या रानमेवा, रान भाज्या, करवंदे, जांभळे, आळवे, आंबे हा रानमेवा विक्री करण्यासाठी आदिवासी महिला रेल्वे स्थानकात पाट्या घेऊन उभ्या रहातात. कोणताही आवाज व धावपळ न करता प्रवाशांना रानमेवा विक्री करतात. या व्यवसायात मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात.


मात्र रेल्वे स्थानकात या आदिवासी महिलांना पोलीस आणि रेल सुरक्षा बलाचे अधिकारी हुसकावुन देत त्यांचे रानमेवा, फळं, भाज्या फेकुन देत असल्याने आदिवासी महिलांचा रोजगार व मेहनत वाया जावुन अनेकवेळा उपासमार सहन करावी लागते. रेल्वे प्रशासनाने या गरीब आदिवासींना त्रास न देता व्यवसाय करण्याची मुभा द्यावी अशी मागणी आदिवासी सेनेच्या वतीने रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
रेल्वे गाड्यांमध्ये तृतियपंथी, गुटखा पान मसाला, बाहेरील पदार्थ विक्री करणारे हॉकर्स मोठ्या प्रमाणात आहेत. यांना मात्र कोणीही हुसकावत नसुन प्रामाणिकपणे रानमेवा विक्री करणाऱ्या महिलांना त्रास दिला जात असेल तर हे सहन करणार नाही. याकरीता रेल्वे डिव्हीजन मॅनेजरला घेराव घालुन आंदोलन केले जाईल असा इशारा दि. ना. उघाडे यांनी दिला.


या प्रसंगी राजाराम ठाकरे, सविता सर्जेराव, अंबिका गांगड, निर्मला वारे, संगीता वारे, सया कामडी, बापवारे, जया लहामटे, चांगुना झुगरे, तारा शिंगवे, शिवा रौजांळ, संतुबा झुगरे, जनाबाई उघडे, अंजना वारे, कमल ठाकरे, झिगरू कातवारे, विमल पेहरे, दुर्गा आरशेंडे, इंदु पारधी, सिता वारघडे, श्रीधर विर यांच्यासह आदिवासी महिला उपस्थीत होत्या.

Comments
Add Comment

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७