जून २०२५ मध्ये कसे असेल पावसाचे प्रमाण ? काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?

मंबई : दरवर्षी दहा जूनच्या सुमारास मुंबईत मान्सूनचे आगमन होते. पण यंदा मे महिन्यात म्हणजे जवळपास दोन आठवडे आधीच मान्सून मुंबईत येऊन धडकला. मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. या पार्श्वभूमीवर जून २०२५ मध्ये कसे असेल पावसाचे प्रमाण ? काय आहे हवामान विभागाचा अंदाज ? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून २०२५ मध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यंदा जून महिन्यात पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १०८ टक्के जास्त असेल. यामुळे यंदा जून महिन्यात मागील सोळा वर्षांचे पावसाचे रेकॉर्ड मोडीत निघतील, जास्त पाऊस पडेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात वायव्य भारतात पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असेल. मध्य आणि दक्षिण भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

ऐन मे महिन्यात मान्सून महाराष्ट्रात आला असला तरी २८ किंवा २९ मे पासून ५ जून पर्यंत पाऊस पडणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

महाराष्ट्रात मागील चार दिवसांत मुसळधार पावसामुळे २१ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नियमानुसार भरपाई देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आहे.
Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून