Traffic Jam Resolved: निफाड बसस्थानकासमोरील वाहतूक कोंडी सुटणार

संजय धारराव यांचा पाठपुरावा; वेगवेगळ्या यंत्रणांनी घेतला पुढाकार


निफाड : निफाड बस स्थानकासमोर सातत्याने होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी निफाड शिवसेना शहर प्रमुख संजय धारराव यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कामाला लागले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने ही समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे.


निफाड बस स्थानकासमोरील रस्त्यावर झालेली अतिक्रमणे हटवावी, बस स्थानकात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या बस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करावेत, बस स्थानकाचे गेटवर पडलेले खड्डे तात्काळ बुजवावे तसेच या परिसरात होणारी वाहनांची कोंडी कमी होण्यासाठी स्थानकासमोर असणारे रस्ता दुभाजक तोडण्यात यावे यासाठी निफाडचे शिवसेना शहर प्रमुख संजय धारराव यांनी लासलगाव बस आगार प्रमुख सविता काळे यांच्याशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी रस्त्याची अडचण सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंगुलिनिर्देश केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रकाश घोडे यांनी चार दिवसात रस्ता दुभाजक काढणार असल्याचे सांगितले . मात्र आठ दिवस होवून देखील कुठलीच कार्यवाही होत नसल्याने अखेरीस संजय धारराव यांचेसह त्यांचे कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा देताच प्रशासन खडबडून जागे झाले.


सोमवार दि. २६ रोजी लासलगाव बस आगर प्रमुख सविता काळे, वाहतूक व्यवस्थापक नितीन बोठे, वाहतूक नियंत्रक विजय गवळी, विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता जाधव, सार्वजनिक बांधकाम. विभागाचे शाखा अभियंता सागर भांगरे. संदीप मोगल, निफाड नगर पंचायत चे मुख्याधिकारी अमोल चौधरी आदी अधिकारी निफाड बस स्थानकात दाखल झाले. धारराव यांनी बस स्थानकातील समस्यांची जंत्री त्यांच्या समोर मांडली. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना कडक शब्दात ताकीद देत आपल्या टपऱ्या तात्काळ काढून घेण्याचे आदेश दिले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही रस्ता दुभाजक तोडून त्यातून निघणारे मटेरियल बस स्थानक प्रवेशद्वारावर असणाऱ्या खड्ड्यात टाकून खड्डे बुजवून देण्याचे आश्वासन दिले. निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल चौधरी यांनीही रस्त्याच्या बाजूला असणारे व्यावसायिकांना रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची ताकीद दिली. आगार प्रमुख सविता काळे यांनीही बसस्थानकातील अस्ताव्यस्त असणारी वाहने दिसल्यास पार्किंग ठेकेदाराचा परवाना रद्द करण्याची ताकीद दिली. परिणामी, या परिसरात होणारी वाहनांची कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.


संजय धारराव यांना शिवसेना ठाकरे पक्षाचे रमेश जेऊघाले, योगेश कुंदे, राजू हरगावकर, सचिन गीते, बाळासाहेब डांगरे, रतन गाजरे, आकाश धुमाळ यांनी सहकार्य केले.

Comments
Add Comment

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Tuljabhavani VIP Darshan: तुळजाभवानी देवीचं व्हीआयपी दर्शन होणार महाग!

सोलापूर: शारदीय नवरात्रोत्सव (Navratri 2025) अवघ्या १० दिवसांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

हत्ती हटेना... वनविभाग पथक हतबल!

गोवा वन खात्याचे पथक सिंधुदुर्ग सीमेवर सतर्क ओंकार हत्ती आज दिवसभर नेतर्डे परिसरात ठाण मांडून असल्याने गोवा

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ