मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची १००० कोटींची तरतूद, मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश

महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या मंत्री राणे यांच्या सूचना


मुंबई: नुकतच शेतकरी म्हणून गणना झालेल्या राज्यातील मच्छीमारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीला मत्स्यविकास मंत्री नितेश राणे , पदुमचे सचिव डॉ रामास्वामी एन, मत्स्यआयुक्त किशोर तावडे,राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर,व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे व अन्य अधिकारी यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते.



मत्स्य विभागाला कृषीचा दर्जा मिळाल्यानंतर मच्छीमारांचे जीवनमान आणखी उंचावे यासाठी मत्स्यविकास मंत्री नितेश राणे प्रयत्नशील आहेत. त्याच माध्यमातून आजच्या या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत मच्छीमारांना आधुनिक बोटींसाठी, अवजारांसाठी, कोल्ड स्टोअरेजसाठी, जाळ्यांसाठी अशा विविध कामांसाठी वित्तीय पुरवठ्याची गरज असते. यासाठी राज्य सहकारी बँकेच्या व जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्याच्या योजना आखण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी केल्या.तसेच महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या सूचना ही मंत्री राणे यांनी केल्या.


राज्य सहकारी बँकेचे प्रशासक श्री अनासकर यांनी यावेळी मच्छीमारांना योग्य ते सहकार्य करण्याचे सांगत जास्तीत जास्त अर्थपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासीत केले आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

मुंबईत साथीच्या आजारांचे वाढले प्रमाण

मुंबई : गेल्या पंधरावड्यात साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात

'आपली एसटी' ॲपद्वारे कळणार लालपरीचा ठावठिकाणा - प्रताप सरनाईक

मुंबई : प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई

तब्बल १५ वर्षांपासून महिला होती त्रस्त, महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी कायमची केली त्रासातून मुक्तता ..

मुंबई (खास प्रतिनिधी) : रजोनिवृत्तीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्य ६५ वर्षीय महिलेवर