Solapur Rain: मुसळधार पावसाने शेतकरी हवालदिल! टोमॅटो गळाले, आंबे, पेरू, केळीचेही नुकसान

  60

सोलापूर: करमाळा तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. सलग बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान (Rain Hits Crops) झाले आहे. तालुक्यातील सर्व आठही मंडळांत मोठा पाऊस झाला आहे. सततच्या पावसाने शेतामध्ये चिखल झाला आहे. पिकांची मुळे सडू लागली आहेत. भुईमुगाच्या शेंगांना कर आले तर टोमॅटो गळून पडले. आंब्याचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पेरू व डाळिंबाच्या बागांचेही मोठे नुकसान झाले. डाळिंबाच्या कळ्या गळून पडल्या आहेत.


सोलापूरमध्ये आतापर्यंत 258.3 मिलिमीटरचा पाऊस 


तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद तब्बल 258.3 मिलिमीटर आहे. म्हणजेच एक हजार 16 टक्के पाऊस तालुक्यात नोंदला. अर्जुननगर 174.4, केम 294.3, जेऊर 340.3, सालसे 297.7 कोर्टी 249.8 उमरड 340.3, केतुर 200.6 असा या आठ मंडळामध्ये पाऊस झाला. सर्वात जास्त पाऊस जेऊर व उमरड मंडलात नोंदला. याभागात तब्बल 340.3 झाला. सालसेत 297.7 तर केममध्ये 294.3 पाऊस झाला.


तालुक्यातील पश्चिम भागात उमरड, वाशिंबे, पारेवाडी, केतुर याबरोबरच चिकलठाण, कुगाव, शेटफळ, दहिगाव, वांगी परिसरामध्ये डाळिंब, केळी, ऊस, टमाटे, मिरची, ढोबळी मिरची आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्तर भागांमध्ये मांगी, वडगाव, पूनवर, खडकी, आलजापूर, पाडळी, घारगाव, संगोबा आदी ठिकाणी कांदा, केळी, उसाचे मोठे नुकसान झाले. कृषी सहाय्यक संपावर असले तरी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी अनेक ठिकाणी नुकसान ग्रस्त शेताची पाहणी करून काही ठिकाणी पंचनामेही सुरू केले आहेत.
Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’