Traffic Jam Problem: दिंडोरी चौफुलीवर सिग्नल यंत्रणेची गरज, वाहतूक कोंडीने नाशिककर त्रस्त

दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर; प्रशासनाकडून जनतेची अपेक्षा


दिंडोरी: नाशिक-कळवण-दिंडोरी रस्त्यावरील चौफुली या ठिकाणी वाहतूक कोंडीने वाहन धारकांना तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ग्रासले असून,या ठिकाणी उड्डाण पूल किंवा बाह्यवळण रस्ता तयार करण्यात येऊन येथे सिग्नल यंत्रणा हि उभारण्यात यावी अशी मागणी जोर धरून लागली असून शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी विचारमंथन करून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल, दिंडोरी येथील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला असून,वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे,नाशिक ते दिंडोरी हा मुख्य रस्ता असून या रस्त्यातून अनेक जड वाहने,दुचाकी धावत असतात मात्र दिंडोरी येथील चौफुली या ठिकाणी वाहनांची गर्दीच गर्दी बघावयास मिळते, त्यामुळे रस्त्यातच वाहने कोंडली जात असल्याने, रस्त्यातून एक-एक कि.मी. अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वाहनधारकांना वाट पाहावी लागत आहे,त्यामुळे वाहन वाहनधारकांमध्ये संतापाचे लाटा उसळत असून या ठिकाणी उड्डाण पूल अथवा पर्यायी रस्ता अथवा सिग्नल यंत्रणा उभार ण्याचा यांचा विचार करावा व सध्या होणारी वाहतूक कोंडी थांबवावी,अशी मागणी नागरिकामार्फत करण्यात येत आहे, दिवसेंदिवस दिंडोरी शहराची नाशिक-वणी या महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या बिकट होत असल्याने दिंडोरी येथील स्वामी समर्थांचे मूळ केंद्र दिंडोरी असल्याने देशभरातील भक्त दिंडोरीला येत असतात त्यात सप्तशृंगीगड जवळच असल्याने तेथे भक्तगण दर्शनासाठी जात असतात.

गुजरातमधील थंड हवेचे ठिकाण सापुतारा येथुनच जवळच आहे, दिंडोरीचे स्थान हे तसे नाशिक जिल्ह्यात भौगोलिक, आर्थिक, पर्यटन, द्राक्षबागेच्या शेतीबाबत महत्वाचे असे असल्याने दिंडोरी शहरात खऱ्या अर्थाने वाहतुकीची कोंडी होते ती पालखेड चौफुली या ठिकाणीच,या ठिकाणी कोंडी झाल्यास सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प होते.

त्यानंतर उमराळे चौफुली, जनता इंग्लिश स्कूल या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होत असते,जनता विद्यालय हे रस्त्याच्या बाजूला असून या विद्यालयात ५ ते ६ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा भरण्याच्या वेळेस व सुटण्याच्या वेळेस विद्यार्थी रस्त्यावरुन जाताना त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करून घरचा रस्ता धरावा लागत आहे.
Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन

लक्ष्य सेन जपान मास्टर्सच्या उपांत्य फेरीत

कुमामोतो : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने शुक्रवारी माजी विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यूवर

पहिल्या नऊ महिन्यातच मुंबईत रियल इस्टेट बाजारात चार पटीने गुंतवणूकीत वाढ! 'ही' आहे आकडेवारी

मुंबई: वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्याच नऊ महिन्यांत मुंबईच्या रिअल इस्टेट

ईडन गार्डन्समध्ये बुमराहचा ‘फायर-फाईव्ह’; दक्षिण आफ्रिका पहिल्याच दिवशी मैदानाबाहेर

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ईडन गार्डन्सवर रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण