Vaishnavi Hagawane Case: हगवणेंच्या वकिलाचा युक्तिवाद, वैष्णवीच्या चारित्र्याचे हनन करण्याचा प्रयत्न

पुणे: सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणाची सुनावणी शिवाजीनगर कोर्टात झाली. यादरम्यान वैष्णवीचा पती शशांक हगवणे बरोबरच, तिचा सासरा राजेंद्र हगवणे तसेच सासू, नणंद आणि दीर या पाचही अटक आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी, आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयासमोर करण्यात आली आहे. तर, आरोपींच्या वकिलाकडून युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला. तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते, असा युक्तिवाद वकिलाने केला आहे.


दरम्यान, फिर्यादीच्या वकिलांचे सर्व आरोप फेटाळून लावताना वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती असे म्हंटले आहे.



हगवणेंच्या वकिलाचा युक्तिवाद


फिर्यादीच्या वकिलांकडून लावण्यात आलेल्या आरोपावर हगवणेंच्या वकिलांनी न्यायालयात भाष्य केलं.  तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडले गेले होते. त्यातून तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा उंदीर मारण्याचे औषध खाऊन तर एकदा गाडीतून उडी मारून तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता, असा धक्कादायक दावा राजेंद्र हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. त्याचप्रमाणे कस्पटेकडे फॉर्च्युनर गाडीची मागणी केली असल्याचा आरोप फेटाळताना, हगवणे यांकडे आधीच पाच कोटींच्या गाड्या आहेत, तर आम्ही 40 लाखांच्या फॉर्च्यूनरसाठी कशाला छळ  करू, असा युक्तिवाद करत वकिलाने पोलीस कोठडीऐवजी न्यायायलयीन कोठडी देण्याची मागणी केली.



आरोपी वकिलांची न्यायालयीन कोठडीची मागणी फेटाळली


यावेळी, न्यायाधीशांनी आरोपींना पोलीस कोठडी दरम्यान पोलीसांकडून काही त्रास झाला का, हे विचारले असता पाचही आरोपींनी नाही असे उत्तर दिले. तर, आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून न्यायालयाने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. याप्रकरणी, आरोपी वैष्णवीचा नवरा शशांक, आई लता आणि नणंद करिश्माला एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आल असून सासरे राजेंद्र आणि सुशील यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे.


दरम्यान, फिर्यादीच्या वकिलांनी पाचही आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती.  याप्रकरणातील फरार निलेश चव्हाण कुठे आहे, याची चौकशी करायची अद्याप बाकी आहे‌. शिवाय अद्याप पाचही आरोपींचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आलेले नाही. त्यांच्या मोबाईलमध्ये काही महत्वपूर्ण व्हिडीओ शुटींग असू शकतात. तसेच, आरोपींनी हुंड्यात मिळालेले 51 तोळे सोने गहाण ठेवले आहे, त्याची देखील अजून माहिती घ्यायची आहे. शिवाय  वैष्णवीला मारहाण केलेली हत्यारे हस्तगत करायची आहेत. त्यामुळे, आरोपींना पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी वैष्णवीच्या वडिलांच्या वकिलांनी केली होत. त्यानुसार, न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ केली आहे.  ‌ त्याचप्रमाणे आरोपी निलेश चव्हाणला अडकवण्यात येत असल्याचंही वकिलांनी म्हटलं आहे.



निलेश चव्हाणला अकडवण्यात आलंय


वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाण याचे नाव देखील प्रामुख्याने येते. वैष्णवीचे बाळ काही दिवस निलेश चव्हाणकडे होते. जे आता वैष्णवीच्या आई बाबांकडे म्हणजेच कस्पटे कुटुंबांकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आलं आहे. त्यामुळे या केसमध्ये निलेश चव्हाणला आरोपी करणे चुकीचं असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. उलट निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ केला आहे. पण, त्यानेच हेळसांड केली म्हणून त्याच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही, तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या.पण त्याला या प्रकरणात आरोपी करणेच चुकीचे आहे‌, असा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.

Comments
Add Comment

मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर

हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली मुंबई : हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला

पवारांच्या आमदाराने जरांगेंकडून पुन्हा आंदोलन करवले- छगन भुजबळ

नागपूर : अंतरवली सराटी येथे 2 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन पुन्हा सुरू

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत