शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, खरिपाच्या MSP मध्ये वाढ

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशहिताचे पाच निर्णय घेण्यात आले. यातील एका निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. केंद्र सरकारने खरिपाच्या MSP मध्ये अर्थात किमान आधार मुल्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने २०२५ - २०२६ या वर्षासाठी धान्य, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या खरिपाच्या पिकांसाठी किमान आधारा मुल्यात वाढ केली आहे. शेतकऱ्यांना किमान आधार मूल्य देण्यासाठी सरकारने यंदा दोन लाख सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात थेट वाढ होणार आहे.



तांदुळासाठी प्रति क्विंटल किमान २,३६९ रुपये मिळतील. सरकारी निर्णयानुसार तांदुळाच्या किमान आधार मुल्यात ६९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना तूर डाळीसाठी प्रति क्विंटल किमान आठ हजार रुपये मिळतील. सरकारने तूर डाळीच्या किमान आधार मुल्यात ४५० रुपयांची वाढ केली आहे. उडदाच्या डाळीचे किमान आधार मूल्य ४०० रुपयांनी वाढवून ७,८०० रुपये करण्यात आले आहे. मूग डाळीचे किमान आधारमूल्य ८६ रुपयांनी वाढवून ८,७६८ रुपये करण्यात आले आहे. मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून अकरा वर्षात तेलबिया, डाळी आणि कापसाच्या किमान आधार मुल्यात अर्थात एमएसपीमध्ये सुमारे पन्नास टक्के वाढ केली आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्ना दुपटीपेक्षा जास्त वाढ व्हावी यासाठी सतत प्रयत्न करत आहे.



केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर ४ टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. याशिवाय, पायाभूत सुविधांच्या बाबतीतही सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशातील बडवेल नेल्लोर ४ पदरी महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच, रतलाम ते नागदा रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील वर्धा ते बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंध्र प्रदेशमधील बडवेल ते नेल्लोर या चौपदरी महामार्गाच्या प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. हा १०८ किमी. चा प्रकल्प आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन