अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार - आदिती तटकरे

मुंबई : एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी विविध निकषांवर अंगणवाडीचे गुणात्मक मूल्यमापन करण्यात येणार आहे. याचबरोबर गुणांकनानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्ताच्या निकषांमध्ये सुधारणा करणेबाबत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सह सचिव वी. रा. ठाकूर, एकात्मिक बाल विकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती संगीता लोंढे, विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव प्रसाद कुलकर्णी आदींसह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार प्रोत्साहन भत्ता दिला देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता निकष ठरविण्यात येणार आहेत. अंगणवाडी केंद्राने 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400 रुपये, 6 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये, 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये व 10 निकष पूर्ण केल्यास 2000 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा निवृत्ती नंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅच्युइटी (एकरकमी आर्थिक सहाय्य) देण्या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.

यामध्ये घरपोच आहार, वृद्धी संनियंत्रण क्षमता, तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण, गरम ताजा आहार, आहार आरोग्य दिवस, मुलांचे पोषण उपचार पुनर्वसन, स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे, खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे असे निकष ठरविण्यात आले आहेत.

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती दिनी करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी मंत्री तटकरे यांनी दिली.

Comments
Add Comment

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, प्रशांतच्या बहिणीचा मोठा खुलासा

सातारा : साताऱ्यातील फलटण येथे महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे. या

फलटणमध्ये महिला डॉक्टरची आत्महत्या, निलंबित PSI बदनेचा शोध सुरू

सातारा : सातारा जिल्हातील फलटण मधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपी प्रशांत

तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद, भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर समितीने घेतला निर्णय

तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची आई तुळजाभवानी ही अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. याच कारणामुळे या

पाच महिन्यांचा छळ आणि अखेर दुर्दैवी शेवट; डॉक्टर तरुणी प्रकरणाची A टू Z कहाणी उघड

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिस आणि राजकीय दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याने

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद