Saturday, June 21, 2025

Corona Death: कल्याण डोंबिवलीत आणखीन एक कोरोनाचा बळी, कळवा हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार

Corona Death: कल्याण डोंबिवलीत आणखीन एक कोरोनाचा बळी, कळवा हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार
ठाणे: देशभरात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून, महाराष्ट्रातही कोरोनाने हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. दरम्यान  ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (केडीएमसी) आणखीन एका रुग्णाचा कोविड-१९ ने मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, या ठिकाणी आणखीन एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी ४७ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद होती. त्यानंतर आता 57 वर्षीय पुरुषाचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे.

कोरोनाने कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांची चिंता वाढवली


या व्यक्तीवर कळवा रुग्णालयामध्ये गेल्या सहा दिवसांपासून उपचार सुरू होते. केडीएमसीमध्ये सध्या दोन कोरोना रुग्णांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनाने कल्याण-डोंबिवलीमधील नागरिकांची चिंता वाढवली आहे.

 
Comments
Add Comment