दक्षिण मुंबईकरांसाठी बुधवार, गुरूवारी पाणीबाणी

पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे 'ई' विभागातील पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्याकरिता नवीन कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत नवानगर, डॉकयार्ड मार्ग येथील जुनी १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी बंद करून, नवीन १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच भंडारवाडा जलाशयाचा कप्पा १ वरील ९०० मिलिमीटर व्यासाचे जुने जलद्वार काढून नवीन ९०० मिलिमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्यात येणार आहे. ही दोन्ही कामे बुधवारी २८ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहेत.


हे काम गुरुवारी २९ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कालावधीमध्ये दक्षिण मुंबईतील कुलाबा ते भायखळा, माझगाव आदी परिसरातील काही भागांत १०० टक्के पाणीकपात केली जाणार असून काही भागांमध्ये अंशतः पाणीकपात करण्यात येणार आहे या परिसरातील नागरिकांनी, या जलवाहिनी बदलण्याच्या कामाच्या आधी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा.


तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा. तसेच या जलवाहिनीच्या कामानंतर संबंधित परिसरांमध्ये पुढील दोन दिवस कमी दाबाने व गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, तसेच महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



हे पॉइंटर्स


नेव्हल डॉकयार्ड पाणीपुरवठा परिक्षेत्र- सेंट जॉर्ज रुग्णालय, पी. डि'मेलो मार्ग, बाबूला टँक परिक्षेत्र, डोंगरी 'ब'परिक्षेत्र, मुंबई पोर्ट ट्रस्ट (बी. पी. टी.) परिक्षेत्र- संपूर्ण मुंबई पोर्ट ट्रस्ट (बी. पी. टी.) परिक्षेत्र, मध्य रेल्वे - रेल्वे यार्ड, भायखळा पश्चिम, मुंबई सेंट्रल, बाबूला टँक, चिंचपोकळी, काळाचौकी, माझगाव, डॉकयॉर्ड, जे जे रुग्णालय परिसर, भायखळा पूर्व आदी परिसरात पाणीकपात करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात