Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर करतो. पण बऱ्याचदा फरक दिसून येथ नाही. त्यामुळे अनेकांचा कल हा सध्या घरगुती उपायांकडे वळत आहे. जर तुम्ही पण घरगुती उपाय करताय तर स्वयंपाकघरातील या एका फळभाजीपासून तुम्ही तुमचा चेहरा चमकदार करू शकता.


तर यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातील भाज्यांची चव वाढवणारे टोमॅटोचा स्किन केअर रूटिंगमध्ये समावेश करू शकता.जे तुमच्या त्वचेच्या काळजीचा एक भाग आहे. हे केवळ तुमची त्वचा स्वच्छ करणार नाही तर मुरुम, काळे डाग यासारख्या समस्यांपासून आराम देण्यास देखील मदत करेल. तर या लेखात तुम्ही टोमॅटोला तुमच्या स्किन केअरचा भाग कसा बनवू शकता ते जाणून घेऊया.


टोमॅटोमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. त्यात व्हिटॅमिन ए, के, सी, लायकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत करतात. उन्हाळ्यात ते चेहऱ्यावर लावल्याने टॅनिंगची समस्याही कमी होते.



टोमॅटोने बनवा हे ५ फेस पॅक


१) टोमॅटो आणि मधाचा फेस पॅक


टोमॅटो आणि मधाचा फेस पॅक बनवण्यासाठी, एका भांड्यात टोमॅटोची प्यूरी घ्या. नंतर त्यात दही, बेसन टाका आणि फेस पॅक बनवा. आता तयार फेसपॅक १५-२० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा मऊ होईल आणि तुम्हाला त्वरित चमक देखील मिळेल.


२) टोमॅटो आणि हळदीचा फेस पॅक


टोमॅटो आणि हळद दोन्ही त्वचा स्वच्छ करण्यास मदत करतात. एका भांड्यात टोमॅटोचा रस काढा आणि त्यात थोडी हळद आणि गुलाबपाणी टाका. नंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे लावा. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात जे तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी करण्यास मदत करतात.


३) टोमॅटो आणि कॉफीचा फेस पॅक


टोमॅटो आणि कॉफीचा फेस पॅक बनवण्यासाठी, एका भांड्यात थोडे दही, टोमॅटोचा रस आणि कॉफी पावडर मिक्स करा, यानंतर ते चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा आणि नंतर चेहरा धुवा. तेलकट त्वचा असलेल्यांसाठी हा फेस पॅक सर्वोत्तम आहे.


४) टोमॅटो आणि लिंबू त्वचेसाठी वरदान


टोमॅटो आणि लिंबू दोन्हीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ते त्वचा स्वच्छ आणि नितळ होण्यास मदत होते. यासाठी एका भांड्यात टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस मिक्स करा आणि तो चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे लावा आणि नंतर चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होईल.


५) टोमॅटो आणि काकडीचा फेस पॅक


उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही टोमॅटो आणि काकडीचा वापर करू शकता. यासाठी टोमॅटो आणि काकडीचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग देखील कमी होते.



(टीप : वरील सर्व बाबी प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून प्रहार कोणताही दावा करत नाही.)

Comments
Add Comment

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे

कॉर्टिसोल म्हणजे काय? 'तणावाच्या संप्रेरका' बाबतच्या सोशल मीडियावरील दाव्यांमध्ये किती तथ्य? डॉक्टरांचा सल्ला

सध्या इंटरनेटवर 'कॉर्टिसोल' (Cortisol) या हार्मोनची मोठी चर्चा आहे. वेलनेस इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियावर पहाटे ३ वाजता