पावसाळा महापालिकेच्या पथ्यावर पडणार

असाच पावसाळा राहिल्यास राखीव कोट्यातील पाणी उचलण्याची येणार नाही वेळ


मुंबई :मुंबईकरांना पुरवठा होणाऱ्या जलसाठ्यांमध्ये सध्या केवळ १५.७५ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक असला तरी यंदा महापालिकेने पाणीकपात न करता मुंबईकरांना दैनंदिन पाणीपुरवठा १०० दशलक्ष लिटरने वाढवून दिला आहे. मात्र, पावसाने जर यंदा लावलेली हजेरी पुढे अशीच कायम ठेवल्यास मुंबईकरांना दिल्या जाणाऱ्या पाण्यासाठी महापालिकेला अधिक पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे यंदाची पावसाची हजेरी ही महापालिकेचा पाण्यासाठी होणारा संभाव्य खर्च टाळणारी ठरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरण तथा तलावांमधून दैनंदिन ४००० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सध्या यासर्व धरण तथा तलावांमध्ये वर्षभराच्या एकूण १४ लाख ४७ हजर ३६३ दशलक्ष लिटर पाण्याच्या तुलनेत सध्या २५ मे २०२५ पर्यंत १५.७५ टक्के एवढा पाणी साठा उपलब्ध आहे, तर मागील वर्षी याच तारखेला सुमारे ९.६९ टक्के एवढा पाणी साठा उपलब्ध होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत साठा अधिक असला तरी पाण्याची वाढती मागणीचा विचार करता भविष्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून पाणीकपात करावी लागू नये यासाठी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्या मागणीनुसार, भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव जलसाठ्यातून महापालिकेला पाणी उपलब्ध करून देण्यास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे.


त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणातील पुरेसा पाणी साठा आणि भविष्यात राखीव कोटा लक्षात घेता १०० ते १२५ दशलक्ष लिटर पाणी साठा वाढवण्यात आला. या सर्व धरणातील पाणी साठा ८ टक्क्यांवर येताच राखीव कोट्यातील पाणी उचलण्यात येईल. राखीव कोट्यातून उर्ध्व वैतरणा धरणातून ६५ लाख क्युसेस आणि भातसातून १ लाख ११ हजार क्युसेस पाणी उचलले जाईल. मात्र, हे पाणी गरजेनुसार उचलले जाईल.


जर पाऊस आल्यास येथील पाणी उचलले जाणार नाही. कारण शासनाच्या धरणातून उचलल्या जाणाऱ्या महापालिकेला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार राखीव कोट्यातील पाणी उचलले जाईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदा पावसाने ज्याप्रकारे हजेरी लावली आहे, तीच जर पुढील काही दिवस कायम राहिल्यास मुंबईला पाणीपुरवठा करताना तलावातील वाढणाऱ्या पाणी साठ्यामुळे राखीव पाणी साठ्यातील उर्ध्व वैतरणा आणि भातसामधून पाणी उचलण्याची गरज भासणार नाही आणि ते पाणी उचलल्यास यासाठी मोजले जाणारे पैसे सरकारला अदा करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे संभाव्य खर्च टाळता येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या तलाव क्षेत्रात पाऊस दिसून येत नाही. पण पुढे पावसाळा कसा असेल याची खात्री नाही, पण साडेआठ टक्क्यापर्यंत साठा गेल्यास उर्ध्व वैतरणा आणि भातसाच्या राखीव साठ्यातून पाणी उचलावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.



सर्व तलाव क्षेत्रातील पाणी साठा
२५ मे २०२५ : २ लाख २७ हजार ९९५ दशलक्ष लिटर (१५.७७ टक्के)
२५ मे २०२४ : १ लाख ४० हजार २२० दशलक्ष लिटर (०९.६९ टक्के)
२५ मे २०२३ : २ लाख १८ हजार ५१० दशलक्ष लिटर (१५.१० टक्के)

Comments
Add Comment

डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता

करिअर : सुरेश वांदिले डिजिटल व्यवसाय आणि उद्योजकता विषयातील बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए-डीबीइ) हा

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

महिलांच्या वाढलेल्या विक्रमी मतदानामुळे एनडीएचे पारडे जड?

निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही

मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांना पूरपरिस्थितीत बचावाचे प्रशिक्षण, ऍडवॉन्स फ्लड आणि रेस्क्यू प्रशिक्षणाकरता नेमली संस्था

पाण्यात आणि उंचावर अडकलेल्यांना अत्याधुनिक पध्दतीने वाचवण्यासाठी करणार प्रशिक्षित मुंबई (खास प्रतिनिधी):

पवई तलावातील जलपर्णी वाढता वाढता वाढे, कंत्राटदाराला मिळाला १ कोटी रुपयांचा बोनस

मुंबई (सचिन धानजी): मुंबईतील पवई तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावरील जलपर्णी वनस्पती, तरंगणा-या तसेच जमिनीतून