Sourav Ganguly : सौरव गांगुलीच्या भावाची स्पीड बोट उलटली अन्..

भुवनेश्वर: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचे मोठे बंधू आणि त्यांची पत्नी मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. सौरव गांगुली यांचे मोठे बंधू स्नेहाशीष गांगुली आणि त्यांची पत्नी अर्पिता यांची स्पीडबोट अचानक उलटली. पोलिसांनी ही माहिती सोमवारी दिली. शनिवारी संध्याकाळी लाईटहाऊसच्या जवळ ही घटना घडली. ही घटना ओडिशात घडली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.


सौरव गांगुली यांचे मोठे बंधू आणि त्यांची पत्नी ओडिशाच्या पुरी समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते. वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी सुरु असताना दांपत्याच्या स्पीड बोटचा अपघात झाला. सौरव गांगुलीचा मोठा भाऊ आणि वहिनी अपघातापासून थोडक्यात बचावले. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात स्पीड बोट उलटलेली दिसत आहे. जीव रक्षकांकडून पर्यटकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी रबरी फ्लोटचा वापर केला.



'बोटीमध्ये कमी प्रवासी होते. त्यामुळे ती हलकी होती. समुद्र अतिशय उग्र होता. त्यामुळे बोट उलटली. बोटीची क्षमता १० प्रवाशांची होती. पण पैशांच्या लालसेपोटी चालकानं केवळ ३ ते ४ जण चढल्यावरच बोट सोडली. त्या दिवशी समुद्रात जाणारी ती शेवटची बोट होती. समुद्रात जाताना आम्हाला भीती वाटत होती. आम्ही हे बोट चालकाला बोलून दाखवल होत. पण परिस्थिती नियंत्रणात असल्याचं त्यांनी सांगितलं,' अशी माहिती अर्पिता यांनी दिली.


वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटींचा काटेकोरपणे तपासणी करण्याची मागणी अर्पिता गांगुली यांनी केली. 'अधिकाऱ्यांनी या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सवर बंदी घालायला हवी. पुरीच्या किनाऱ्यावर समुद्र जास्त खवळलेला आहे. मी कोलकात्यात परत गेल्यावर यासंदर्भात पोलीस अधिक्षक आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून येथील वॉटर स्पोर्ट्स बंद करण्याची मागणी करणार आहे,' असं अर्पिता यांनी सांगितलं.

Comments
Add Comment

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी

ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल काळाच्या पडद्याआड

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनेक पिढ्यांना भुरळ घालणाऱ्या सुवर्णकाळातील दिग्गज

‘ताठ कणा’ मध्ये दिसणार उमेश आणि दिप्तीची जोडी

मुंबई : सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराची आपली एक वेगळी इमेज आहे. प्रत्येकजण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकेसाठी

श्रेया घोषालच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी! ओडिसाच्या बाली यात्रेला गालबोट

ओडिसा: सुप्रसिद्ध भारतीय गायिका श्रेया घोषालचा ओडिसा कटक येथे १३ नोव्हेंबरला लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित केला होता.