अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ लाखांचे नुकसान

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेले चार ते पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात एकूण ५९ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून यामध्ये २१ लाख ४४ हजार १७० रुपयांचे अंदाजित नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील ५९ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये पायाभूत सुविधांचेही अंशतः नुकसान झाले असून त्याची अंदाजित किंमत १५ हजार रुपये आहे. याबाबतचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे. यात सर्वाधिक फटका घरांना बसला आहे.

अहवालानुसार ५४ घरांचे अंशतः नुकसान झाले असून त्याचे अंदाजित मूल्य २० लाख २४ हजार १७० रुपये आहे. तर, २ घरांचे पूर्णपणे नुकसान झाले असून, त्याची अंदाजित किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा अधिक तपशीलवार आढावा घेतला जात असून बाधित कुटुंबांना आणि गावांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत

मुंबई पोलिसांचा दाऊदच्या टोळीला मोठा झटका! ड्रग्सचा कारखाना सांगलीत तर मास्टरमाइंड दुबईतून पकडला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (गुन्हे शाखेने) एक मोठे ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय जाळे पकडून दाऊद