Sunday, September 14, 2025

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ लाखांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ लाखांचे नुकसान
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेले चार ते पाच दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात एकूण ५९ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून यामध्ये २१ लाख ४४ हजार १७० रुपयांचे अंदाजित नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ५९ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये पायाभूत सुविधांचेही अंशतः नुकसान झाले असून त्याची अंदाजित किंमत १५ हजार रुपये आहे. याबाबतचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे. यात सर्वाधिक फटका घरांना बसला आहे. अहवालानुसार ५४ घरांचे अंशतः नुकसान झाले असून त्याचे अंदाजित मूल्य २० लाख २४ हजार १७० रुपये आहे. तर, २ घरांचे पूर्णपणे नुकसान झाले असून, त्याची अंदाजित किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचा अधिक तपशीलवार आढावा घेतला जात असून बाधित कुटुंबांना आणि गावांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Comments
Add Comment