Mumbai Rain: मुंबईत पावसाचा पहिला बळी; विक्रोळीत झाड कोसळून तरुणाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत कालपासून नैऋत्य मान्सूनचे जोरदार आगमन झाले, आणि या पहिल्याच पावसाने मुंबई शहराला अक्षरशः झोडपून काढले. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी पाणी साचण्यासोबत झाड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, विक्रोळीतील कन्नमवार नगरमध्ये अशाच एका झाड कोसळण्याची घटना घडली आहे, ज्यामध्ये २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तेजस नायडू असं या तरुणाचं नाव असून, तो आपल्या दोन मित्रांसोबत गणेश मैदानाजवळ पावसापासून आश्रय घेण्यासाठी झाडाखाली थांबला होता.



अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस कोसळत होता. विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील गणेश मैदानाजवळ तीन तरुण झाडाखाली उभे होते. पाऊसाबरोबरच वारे देखील प्रचंड वाहत होते, याचवेळी अचानक एक मोठं जंगली झाड त्यांच्या अंगावर कोसळलं.  झाड थेट तेजस नायडूच्या डोक्यात आदळलं, तर इतर दोन तरुण थोडक्यात बचावले गेले.


घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. तेजसच्या मित्रांनी आरडाओरड करून स्थानिक नागरिकांना मदतीसाठी बोलावलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. झाड हटवून तिघांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तेजसला गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तिथे त्याला मृत घोषित केले गेले..

Comments
Add Comment

वेध निवडणुकीचे : धारावीमध्ये फुलणार भाजपचे कमळ

मुंबई(सचिन धानजी) : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील धारावी विधानसभा क्षेत्रात भाजपचा एकही नगरसेवक निवडून

'अंधेरी - घाटकोपर जोड मार्गावरील उड्डाणपुलाच्‍या बांधकामामुळे बाधित होणा-या पात्र रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करा'

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे प्रत्‍यक्ष पाहणी दौ-यादरम्‍यान निर्देश मुंबई (खास

देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील जैव खाणकामासाठी नवयुग इंजिनिअरींगची निवड

बायोमायनिंग प्रकल्पासाठी तब्बल ३०३५ कोटी रुपये होणार खर्च मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्यावतीने देवनार

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या