‘घाबरू नका, पण काळजी घ्या’

कल्याण  :कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत कडोंमपा कार्यक्षेत्रातील जनतेला सुचित करण्यांत येते की, जरी कडोंमपा कार्यक्षेत्रात कोविडने शिरकाव केला असला तरी, घाबरू नका पण काळजी घ्या. कडोंमपा कार्यक्षेत्रात कोविड नियंत्रणात आहे.


तरी, कोविडबाबत वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत जनतेला आव्हान करण्यात येत आहे. गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी विशेषतः सह-व्याधी असणाऱ्या व्यक्ती आणि वृद्ध यांनी जाणे टाळावे. डॉक्टर, पॅरामेडिकल अणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी आरोग्य संस्थामध्ये/रुग्णालयात मास्कचा वापर करावा. शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/टिश्यू वापरणे. हाताची स्वच्छता राखणे/वारंवार हात धुणे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, श्वसनास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकर कोविड चाचणी करावी. श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित करणे. कोविड उपचार व निदानाची सोय सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण व शास्त्रीनगर हॉस्पिटल, डोंबिवली येथे अलगीकरण कक्ष तयार करण्यांत आलेले असून ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे.



त्याचप्रमाणे कोविडसाठी घेण्यात येणारी स्वॅब तपासणी दोन्ही रुग्णालयात करण्यात येते. कोविड तपासणी करण्यासाठी महापालिकेची गौरीपाडा आरटीपीसीआर लॅब उपलब्ध आहे. सौम्य लक्षणे असल्यास स्वतः खात्री करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी. लक्षणे सौम्य असली तरी कोविडचा प्रसार इतरांना होऊ नये म्हणून कार्यालयात, शाळा, महाविद्यालये ठिकाणी/गर्दीच्या ठिकाणी/सार्वजनिक ठिकाणी न जाता पूर्ण बरे होईपर्यंत स्वतः घरी अलगीकरण करावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार व कोविड चाचणी करावी.


सध्या मुंबई-ठाण्यासह राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याचीही नोंद झालेली आहे. तेव्हा पुन्हा कोरोनाच्या धास्तीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा कडोंमपाने निर्धार केला आहे.

Comments
Add Comment

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत