Kasara Ghat : कसारा घाटात कोसळली दरड! पावसामुळे नैसर्गिक विज पडून एकाचा मृत्यू

नाशिक : जिल्ह्यामध्ये रोहिणी नक्षत्राचा पाऊस सुरू असून कसारा घाटामध्ये दरड कोसळली होती. जिल्ह्यातील चार तालुक्यांनी पावसाची शंभरी पार केलेली आहे. एकूणच जिल्ह्यामध्ये १७०.७ मिलिमीटर पावसाची नोंद आत्तापर्यंत करण्यात आलेली आहे.


नाशिक जिल्ह्यामध्ये ३ मे पासून सुरू झालेला बेमोसमी पाऊस २४ दिवसांमध्ये जिल्ह्यात एकूण १७० पॉईंट ७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. तर, सोमवारी उशिरा १२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील इगतपुरी पेठ सुरगाणा दिंडोरी नासिक या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी रात्री उशिरा विजेच्या कडकड्याचा सह जिल्ह्यात झालेल्या पावसाने सुरगाणा तालुक्यातील सादूडने या ठिकाणी मुकुंदा लक्ष्मण वड यांचा हेल्यावर रात्री झालेल्या पावसामुळे नैसर्गिक विज पडून मृत्यू झाला.



इगतपुरी तालुक्यामध्ये सतत सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील कसारा घाट येथे मंगळवारी सकाळी दरडीचा काही भाग कोसळला. त्यामुळे वाहतुकी वरती परिणाम झाला होता. तातडीने ही दरड हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये बागलाण येवला निफाड आणि चांदवड या चार तालुक्यांनी शंभरी पार केली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात नागरिकांना खबरदारीचे उपाय केल्याचा आव्हान केलेला आहे. तर, हवामान विभागाने पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्यासाठी येलो अलर्ट घोषित केलेला आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईत सिडकोच्या ४ हजार ५०८ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध

नवी मुंबई  : सिडकोच्या इतिहासात प्रथमच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर ४ हजार ५०८ घरांची

नवी मुंबईत वर्षभर वाहतुकीत बदल

खारघर-तुर्भे लिंक रोड भूमिगत बोगदा प्रकल्पाचे काम सुरू नवी मुंबई : सिडकोच्या भूमिगत खारघर-तुर्भे लिंक रोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत सुट्टी

मुंबई : घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबई व मुंबई उपनगर

मेट्रो-११ मार्गिकेला मंजुरी

वडाळा ते गेट वे ऑफ इंडियापर्यंतचा प्रवास होणार सुलभ मुंबई  : मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास आणखी सोपा होण्यासाठी

शौर्य पाटील मृत्यू प्रकरणी दिल्ली सरकारची चौकशी समिती

सेंट कोलंबस शाळेच्या चार शिक्षिका निलंबित नवी दिल्ली : दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेत दहावीला शिकणारा सांगलीचा १६

चिमुकलीच्या न्यायासाठी मालेगावात जनआक्रोश!

मालेगाव : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या झाल्याच्या