जामखेड - सौताडा रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी २९ पर्यंत डेडलाईन

जामखेड : जामखेड सौताडा महामार्गाचे शहरातील खर्डा चौक ते बीड रोड पर्यंतचे काम रखडले आहे. गेल्या दोन वर्षांपासून जामखेड सौताडा महामार्गाचे काम लांबले आहे. रखडलेल्या रस्त्याचे काम २९ मे पर्यंत करण्यात यावे अन्यथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेमार्फत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे

गेल्या दोन वर्षांपासून जामखेड शहारातील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले असून या रखडलेल्या कामामुळे जामखेड शहर तालुका व पर जिल्ह्यातील येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना हाल सहन करावे लागत आहेत. तसेच या रखडलेल्या कामामळे अनेक मोटारसायकल चालकांचे अपघात होऊन हात मोडणे, पाय मोडणे, अशा अनेक घटना दोन वर्षात घडल्या आहेत. जून महिन्यात सर्व शाळा विद्यालय सुरु होत आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे रस्त्यावरती चिखलाचे साम्राज्य झाले आहे. रखडलेल्या कामामुळे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने रस्त्याचे काम २९ मे गुरुवार पर्यंत पूर्ण करावे नाहीतर आंदोलन करू आणि त्या आंदोलनाला प्रशासन जबाबदार राहील असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने जाहीर केले आहे.
Comments
Add Comment

प्रजासत्ताक दिनी धाराशिवमध्ये पोलिसाचा मृत्यू

धाराशिव : प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन केल्यानंतर थोड्याच वेळात ५५ वर्षीय मोहन भीमा जाधव या पोलीस अधिकाऱ्याचा

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचविणार

नांदेड : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला

अहिल्यानगरमधील खुनाचा उलगडा समोर, भाच्याने झोपेतच मामाला संपवलं; मामाच्या....

अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये राहत्या घरी एका व्यक्तीचा खून झाला होता. शेवटी या घटनेचा उलगडा सुटला आहे. भाळावस्ती

लोणार सरोवराच्या पाण्याची पातळी अचानक २० फुटांनी वाढ

पाण्याची पातळी वाढण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही नागपूर : महाराष्ट्रातील बुलढाणा येथील लोणार सरोवर पुन्हा एकदा

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ आणि २५ जानेवारी

बुलढाण्यात एसटी बसचा थरार; ब्रेक निकामी झाल्यावर चालकाने....

बुलढाणा : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे