PBKS vs MI, IPL 2025: पंजाब पॉईंट्सटेबलमध्ये अव्वल, मुंबईला ७ विकेटनी हरवले

जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या आजच्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला लोळवले आहे. पंजाब किंग्सने या विजयासह पॉईंट्सटेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. पंजाबचे आता १९ गुण झाले आहेत. तर मुंबई चौथ्या स्थानावर कायम राहिली आहे.


मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाबला विजयासाठी १८५ धावांचे आव्हान दिले होते. पंजाबने हे आव्हान ७ विकेट राखत पूर्ण केले. पंजाबच्या विजयात मोलाचा वाटा ठरला तो जोस इंग्लीश आणि प्रियांश आर्यचा. जोस इंग्लिशने ७३ धावा तडकावल्या तर सलामीवीर प्रियांश आर्यने ६२ धावा ठोकल्या. त्याच्या जोरावर पंजाबला हा विजय साकारता आला.



अशी होती मुंबईची फलंदाजी


पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या मुंबईची सुरूवात शानदार राहिली. रोहित शर्मा आणि रायनल रिकल्टनने धमाकेदार खेळीची सुरूवात केली. मात्र सहाव्या षटकांत मुंबईला पहिला धक्का बसला तो रिकल्टनच्या रूपात. यानंतर सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा यांच्यात चांगली भागीदारी झाली. ९ षटकांत मुंबईची धावसंख्या १ बाद ७९ होती. १०व्या षटकांत मुंबईला दुसरा झटका बसला. रोहित शर्मा २४ धावा करून बाद झाला. यानंतर ११व्या षटकांत तिलक वर्माही बाद झाला. तिलकने केवळ १ धाव केली. तर १३व्या षटकांत विल जॅक्सही बाद झाला. जॅक्सने १७ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने या सामन्यात तडाखेबंद खेळी केली. सूर्याने जबरदस्त अर्धशतक ठोकले. यासोबतच सूर्याने एक नवा रेकॉर्ड केला आहे.सूर्याने या हंगामात आतापर्यंत ६०० धावांचा आकडा पार केला आहे. या दरम्यान त्याने अनेक रेकॉर्ड कायम केले आहेत.


Comments
Add Comment

IPL 2026 : ...म्हणून आयपीएलचा उद्घाटन सोहळा रद्द; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

मुंबई : आयपीएल २०२६ ची सुरुवात २८ मार्चपासून होणार असली तरी यंदा स्पर्धा कोणत्याही उद्घाटन सोहळ्याशिवाय सुरू

ICC T20 Ranking : अभिषेक, ईशान, तिलक आणि सूर्यकुमार अव्वल १० मध्ये कायम

मुंबई : भारताचा अभिषेक शर्मा टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम असून, तो सध्या त्याचा सहकारी ईशान

कोलकाता नाईट रायडर्सने आंद्रे रसेलची जर्सी केली निवृत्त

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आंद्रे रसेलच्या सन्मानार्थ त्याची १२

सौरव गांगुली बनला जॅक्सन ग्रुपचा पहिल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 नेतृत्‍व स्‍थान अधिक दृढ करण्‍यासह शाश्वत विकासाला गती देणार मुंबई : जॅक्‍सन ग्रुप या भारतातील आघाडीच्‍या

फुटबॉलपटू मोहम्मद सलाह नऊ वर्षांनंतर लिव्हरपूलची साथ सोडणार

नवी दिल्ली : इजिप्शियन फुटबॉलचा दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद सलाहने लिव्हरपूल फुटबॉल क्लब सोडण्याची घोषणा केली आहे.

आयपीएलपूर्वी केकेआरचा मोठा निर्णय, रिंकू सिंगची उपकर्णधारपदी नियुक्ती

कोलकाता : तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाने २०२६ च्या आयपीएल हंगामाच्या सुरुवातीपूर्वी