मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, सहा पुलांची होणार दुरुस्ती

मुंबई : दक्षिण मुंबईतील सहा उड्डाणपुलांची लवकरच दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे.

मुंबई महापालिकेने २०२४-२५ मध्ये रस्ते, वाहतूक आणि पूल विभागासाठी एकूण १२ हजार ११० कोटी रुपये ९७ लाख रुपयांची तरतूद केली. यातील पूल कामासाठी ७ हजार ७१० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला. यातील बहुतांश नवीन कामांसाठी निधी मंजूर केला गेला. २०२५-२६च्या अर्थसंकल्पीय अंदाजात पूल विभागासाठी ८ हजार २३८ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पुलांसह अस्तित्वात असलेल्या पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई शहर भागातील जुन्या उड्डाणपुलांचा समावेश आहे. यामध्ये लालबाग, हिंदमाता, जगन्नाथ शंकरशेट (दादर टीटी) उड्डाणपूल, कविवर्य केशवसूत उड्डाणपूल, शीव रुग्णालय उड्डाणपूल, जीटीबीनगर आरओबी यांचा समावेश आहे. या पुलांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी ८९ लाख ३२ हजार रुपये खर्च येणार आहे. पुलांची कामे पावसाळा वगळून १५ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

पुलांवरील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. यामुळे पुलांचे फेरपृष्ठीकरण केले जाणार आहे. पुलांच्या खांबांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. पुलाशी संबंधित इतर आवश्यक ती दुरुस्तीची कामंही केली जातील.
Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती