स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून चार लाखाचा गंडा

शेवगाव ( प्रतिनिधी )-ओळखीचा फायदा घेत स्वस्तात सोने देतो असे सांगून येथील शिवसेनेच्या नेत्या व त्यांच्या पतीने मुंबई येथील रिलायन्स कॉर्पोरेटच्या मॅनेजरला चार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शेवगावी घडला आहे.या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिन्याभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या नेत्या, विद्याताई जावेद गाडेकर व त्यांचे पती जावेद यासीन पठाण ( रा.शेवगाव ) यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात रिलायन्स कॉर्पोरेटचे मॅनेजर अतुल नामदेव अटकळे, ( वय ३७ रा.जुना ठाणे शहर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूक,मारहाण,धमकी व सामूहिक सहभाग अशा विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२३ डिसेंबर २०२० रोजी जावेद यासीन पठाण याने अटकळे यांना त्याचे राहते घरी विद्यानगर येथे बोलावून घेतले. त्यावेळी त्याची पत्नी विद्या या देखील घरीच होत्या.यावेळी घरात असलेली चैतन्य कानिफनाथ मढी यांच्या गादीचे दर्शन घेण्यास सांगितले.आणि त्यांचे घरात असलेले सोन्याचे दागिने दाखविले.त्यावेळी जावेद पठाण अटकळे यांना म्हणाला की, त्याचा सोने विक्रीचा व्यवसाय आहे.मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतो.सोने खरेदी विक्रीचा व्यवसाय असल्याने इतरांना कमी दरात शुद्ध सोने विक्री करुन त्याचा फायदा करुन दिलेला आहे.जास्तीत जास्त पैशाची गुंतवणुक केली तर कमी दरात सोने देईन, असे आश्वासन दिले.

आश्वासनाला बळी पडून १५ जानेवारी २०२१ रोजी अतुल नामदेव अटकळे यांनी २ लाख रुपये आणि २३ जानेवारी २०२१ रोजी आणखी २ लाख रुपये असे एकूण ४ लाख रुपये IMPS द्वारे त्यांच्या खात्यावर वर्ग केले.मात्र त्यानंतर सांगितल्याप्रमाणे, त्या दोघांनी कोणतेही शुद्ध सोने दिले नाही. दरम्यानच्या काळात कोव्हिड असल्याने अटकळे यांचे शेवगाव येथे येणे झाले नाही.यादरम्यान त्यांनी वेळोवेळी फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतले नाही.वारंवार टाळाटाळ केली.तसेच त्यांनी कोणतेही शुद्ध सोने दिले नाही.आणि गुंतवणूक केलेले पैसेही परत केले नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगुन टाळाटाळ केली. त्या दोघांना पैसे मागितले असता तुमचेवर खोटा गुन्हा दाखल करु आणि जेलमध्ये टाकू अशी धमकी दिल्याचे अतुल नामदेव अटकळेने सांगितले. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले हे करत आहेत.
Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी मोठी भेट, ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा

दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना फायदा सुधारीत भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून

महसूली सुनावण्याचे अधिकारी राज्यमंत्री, सचिवांनाही!

विभागातील १३ हजार अपीलांच्या निपटाऱ्यासाठी मार्ग मोकळा मामलतदार न्यायालय अधिनियमन सुधारणा विधेयक विधानसभेत

मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना हक्काचे घर

'मदत माश' जमिनीच्या मोफत नियमितीकरणाचा मार्ग मोकळा ​'वर्ग-२' च्या जमिनी आता होणार 'वर्ग-१' महसूल मंत्री चंद्रशेखर

महसूल विभागातील सर्व खटले ९० दिवसांत निकाली काढणार

महसूलमंत्र्यांचे आश्वासन; सुनावण्यांचे अधिकार आता राज्यमंत्री आणि सचिवांनाही नागपूर : महसूल विभागातील

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याचे अंदमान येथे अनावरण

'सागरा प्राण तळमळला' कार्यक्रमाचे आयोजन नागपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमान येथे

जुन्नर वनविभागात बिबट्याचा हैदोस! २५ वर्षांत ५५ बळी, २८ हजार पशुधन फस्त; नसबंदी आणि AI कॅमेऱ्यांचा वापर करण्याची शासनाची माहिती

नागपूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागात वन्यप्राणी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या