मान्सून महाराष्ट्रात दाखल! भारतीय हवामान विभागाची अधिकृत घोषणा

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून राज्यात विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या झळा त्यामुळे कमी झाल्या असल्या तरीही हा पूर्वमोसमी पाऊस आहे की मान्सून अशी शंका शेतकरी वर्गामध्ये होती. पूर्वमोसमी पावसानंतर मान्सूनचे आगमन लांबणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना आज भारतीय हवामान विभागाने आजपासून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे.


यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल १२ दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी साधारणतः ७ जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो. शनिवारी केरळात पोहोचलेल्या मान्सूनला, महाराष्ट्रात आगमनासाठी एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मात्र यंदा हवामानातील पोषक स्थितीमुळे अवघ्या काही तासांतच मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला.



यंदाच्या वर्षी राज्यात आणि देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सून १०७ टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतक-यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातही समाधानकारक आणि भरघोस पावसाची शक्यता असल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळू शकतो. १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यानचा पाऊस मान्सूनचा म्हणून नोंदवला जातो.


केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि आगेकूच करत ८ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापतो, तर १७ सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य हिंदुस्थानातून माघारीचा प्रवास सुरू करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेतो, पण दरवर्षी १ जून या तारखेला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला आहे. याआधी २००९ आणि २००१ मध्ये मान्सून २३ मे रोजीच दाखल झाला होता. गेल्या वर्षी २०२४मध्ये मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये धडकला होता. १९१८ मध्ये सर्वात लवकर म्हणजेच ११ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. २५ मे रोजी मान्सून दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्वात आधी १९५६ साली २९ मे रोजी लवकर मान्सून दाखल झाला. यानंतर ३१ मे १९९० रोजी लवकर मान्सून दाखल झाला.

Comments
Add Comment

Nashik Earthquake : नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक : राज्यात उन्हाचा कडाका वाढत असताना नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र वेगळीच परिस्थिती निर्माण

पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी तरतूद

पुणे : पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा, खडकवासला-स्वारगेट-हडपसर-लोणी काळभोर मार्ग आणि पुणे ते शिरूर ५३ किमीचा उन्नत

Buldhana News: आईला कॉल करत संपवलं आयुष्य; नेमकं घडलं काय?

बुलढाणा: आईला शेवटचा कॉल करुन तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची बातमी समोर येत आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी

‘शाळा बंद’ धोरणाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान

हायकोर्टाने बजावली शिक्षण विभागास नोटीस अमरावती : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९

Iran Israel Conflict Affect In India: इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचला, नेमकं काय झालं?

दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज सातवा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू असून सध्या

नागझिरा अभयारण्यात ‘चष्मेवाला’ पक्ष्याचे दर्शन

अमरावती : विदर्भातील निसर्गसंपन्न नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी येथील डॉ. वांगारी मुटा माथाई रोपवाटिकेत