राज्यात १ जूनपासून ‘महाराजस्व अभियान’

  109

पुणे : राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे महसूल विभागातील विविध कार्यालयात प्रलंबित असलेली प्रश्न निकाली काढण्यासाठी १ जून ते ३१ जुलै दरम्यान ‘ महाराजस्व अभियान ’राबविण्यात येणार आहे.


याबाबत राज्य शासनाच्या महसूल विभागाचे सहसचिव डॉ.सत्यनारायण बजाज यांनी अध्यादेश जारी केला आहे. या निर्णयानुसार एका महिन्याच्या आत प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, त्यासाठी मंडळनिहाय फेरफार अदालतीचे आयोजन करणे बंधनकारक केले आहे. तहसिल, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी या स्तरावर एक ते तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी प्रलंबित असलेल्या फेरफार निकाली काढण्यात येणार आहेत.भूसंपादन केलेल्या अकृषिक परवानगी (एन.ए. ऑर्डर) कमी जात पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करणे. जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४२ (ब), ४२ (क), आणि ४२(ड ) नुसार समाविष्ट होणाऱ्या जमीनींच्या भोगवटदारांकडून अकृषिक रक्कम आकारणीची रक्क्म भरून घेणे आणि त्या अनुषंगाने संबधितांना सनद देण्याचे तरतूद करण्यात आली आहे.


त्यानुसार सर्व मिळकत धारकांना देण्याच्या अकृषिक आकारणी मागणीची नोटिसा देणे, त्याची तातडीने कारवाई करावी. गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद केलेले गाडी रस्ते, पाणद, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करणे तसेच वहिवाटीचे रस्ते मोकळे करणे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच लाभ होण्यास मदत होणार आहे. ही मोहीम सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.


या अभियानात गाव तिथे स्माशानभूमी, दफनभूमी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करणे, लोकसेवा हक्क अधिनियम -२०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करणे, शैक्षणिक प्रयोजनासाठीचे दाखले व नागरिकांना उपलब्ध करून देणे, त्यासाठी गावपातळीवर शिबीरे घेणे. वाजिब -ऊल -अर्जच्या नोंदी अद्यावत करणे, मोजणी प्रकरणे निकाली काढणे, ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमबजावणी सर्व स्तरावर करावी.

Comments
Add Comment

शिक्षकाने लॉजमध्ये जाऊन का केली आत्महत्या?

नांदेड : नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंधार तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेत कार्यरत

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग