ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनाचे २० रुग्ण

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या चार दिवसांत कोरोनाचे २० रुग्ण आढळले असून त्यापैकी एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो गंभीर स्वरूपाच्या मधुमेहामुळे रुग्णालयात गुरुवारी दाखल होता. शुक्रवारी त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आणि २४ तारखेला त्याचे निधन झाल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली आहे. दुसरीकडे ठाण्यात नवीन ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारपर्यंत महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १० रुग्ण आढळले. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून त्या सर्व रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी चेतना नितील यांनी दिली. त्याचबरोबर, सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून तेथे टेस्टिंग कीटही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे कोरोनाच्या रुग्णांसाठी १९ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात असून, आरटीपीसीआरची सुविधाही रुग्णालयात उपलब्ध असल्याचेही रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले. १७ रुग्णांची प्रकृती स्थिर असून, ते गृह विलगीकरणात असून एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Comments
Add Comment

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे

भिवंडीत विकासकाकडून १०० कोटींचा घोटाळा?

फसवणूक झालेल्या कुटुंबाचे आ. संजय केळकर यांना साकडे ठाणे  : भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत

डोंबिवलीत सापडला महिलेचा मृतदेह; पती फरार

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात बुधवारी सकाळी किरकोळ घरगुती वादातून पत्नीची गळा आवळून