पवना धरणामध्ये ३१ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा!

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन


पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर, देहूरोड, तळेगाव व मावळमधील अनेक ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये केवळ २७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी केले.


मावळ तालुक्यातील सर्वात मोठे पवना हे धरण असून पिंपरी-चिंचवड शहराला मोठ्या प्रमाणात याच धरणामधून पाणी घेतले जाते. पिंपरी- चिंचवड शहरांसह महाराष्ट्रभर सध्या अवकाळी पावसाचा जोर आहे. मात्र हा पाऊस कायमचा राहत नसून केव्हाही बंद होऊ शकतो असे जाणकार सांगत आहेत.


पवना धरणामध्ये केवळ २७ टक्के पाणीसाठा शिल्लक असून हा पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहराला ३१ जुलैपर्यंत पुरु शकतो आणि सध्या असलेल्या अवकाळी पावसाचा भरवसा नसल्याने शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे असल्याचे पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे.


गेल्या दहा दिवसांपासून मावळमध्ये पडलेल्या पावसामुळे पवना धरणामध्ये किती पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली असे विचारले असता सह शहर अभियंता सूर्यवंशी म्हणाले की " सध्या सर्वत्र पावसाचा जोर असला तरी धरणामध्ये पाणी वाढण्यासाठी सुरुवातीचे पंधरा दिवस लागतात. धरण परिसरातील छोटे मोठे खड्डे भरण्यास वेळ लागतो आणि ते सर्व खड्डे भरल्यानंतर धरणामध्ये पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सध्या पडत असलेल्या पावसामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ होत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणी आवश्यक तेवढे वापरावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

Comments
Add Comment

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष