आरेच्या जंगलात शाही ससाण्याचे दर्शन

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध असलेल्या आरेच्या जंगलात काही दिवसांपूर्वी शाही ससाण्याचे दर्शन घडले. यामुळे पक्षीप्रेमी तसेच पर्यावरणतज्ज्ञांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, भारतीय उपखंडात आढळणारा शाही ससाणा हा शिकारी पक्षी असून, आरेच्या जंगलात तो दिसणे ही आश्चर्यकारक बाब आहे.


काही दिवसांपूर्वी वन्यजीव छायाचित्रकार महेश यादव यांनी शाही ससाण्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले असून, हा ससाणा काही वेळ आरे वसाहतीतील तबेल्याच्या शेडवर बसला होता आणि नंतर त्याने भरारी घेतली.



आरे परिसरातील वन्यप्राणी संवर्धनासाठी ही एक सकारात्मक नोंद ठरते, असे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान, शाही ससाणा हा जगातील सर्वात वेगवान पक्षी मानला जातो. त्याचे मुळ खाद्य लहान पक्षी असते. वाढत्या शहरीकरणाचा त्याच्या अधिवासावर मोठा परिणाम झाला असून, मुंबईसारख्या महानगरात त्याचे दर्शन झाले हे जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरते. यापूर्वीही शाही ससाण्याच्या नोंदी झाल्या आहेत.


ही घटना आरे जंगलातील जैवविविधतेचे आणि संरक्षित वनक्षेत्राचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखीत करते. अशा दुर्मिळ जीवांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आरेसारख्या हिरवळीच्या क्षेत्राचे संवर्धन आवश्यक आहे, असे मत पक्षी निरीक्षकांनी व्यक्त केले. शाही ससाणा हा पेरेग्रीन फाल्कन या प्रजातीची एक उपप्रजाती असून तो विशेषतः भारतीय उपखंडात आढळतो. हा पक्षी अत्यंत वेगवान शिकारी पक्षी म्हणून ओळखला जातो. त्याच्या शरीराची लांबी सुमारे ३८ ते ४५ सें.मी. आहे. पंखांची रुंदी ९० ते ११० सें.मी. असून त्याची पाठ काळसर निळसर रंगाची असते.


तसेच छातीवर फिकट तपकिरी आडव्या पट्ट्या असतात. त्याच्या उड्डाणाचा वेग ३०० किमी प्रतीतास किंवा त्यापेक्षा जास्त असतो. त्याचा नैसर्गिक अधिवास डोंगराळ तसेच नदी आणि खाडी परिसरात असतो.


Comments
Add Comment

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार अवघ्या १५ मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या कामाला वेग; भांडुप जंक्शनवर एका रात्रीत ४५० टन वजनाचा बसवला स्टील स्पॅन

मुंबई : केवळ एका रात्रीत मुंबईत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अभियंता पथकाने भांडुप ते सोनापूर

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो होणार सहा डब्यांची; प्रवाशांची होणार गर्दीतून सुटका

३२ अतिरिक्त डबे खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी सुरू मुंबई : मुंबईकरांचा मेट्रो प्रवास आता लवकरच गर्दीमुक्त

आमरण उपोषण मागे; जैन मुनींच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारला १५ दिवसांची मुदत

दादर कबुतरखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी निलेशचंद्र विजय यांचा निर्वाणीचा इशारा; लोढा-नार्वेकरांची

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायिका म्हणून अविस्मरणीय छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे

Coastal Road : २४ तास खुला, पण 'सुरक्षित' नाही! वरळी-वांद्रे सी लिंक दरम्यान पथदिवे बंद; मुंबईकर प्रशासनावर नाराज

मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाहतुकीसाठी २४ तास खुला (24 Hours Open) झाल्यानंतर त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या