Nitesh Rane: रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य उत्पादनात ३,३९६ मेट्रिक टनने वाढ

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या ऐतिहासिक निणर्याचे सकारात्मक परिणाम


रत्नागिरी: ड्रोन सर्वेक्षण, अवैध मासेमारीवरील कडक कारवाई आणि दिवस रात्र गस्त यामुळे यावर्षीच्या मत्स्य उत्पादनात ३,३९६ मेट्रिक टनने वाढ झाली आहे.  २०२४-२५ या मत्स्य वर्षात रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन ७१,३०३ मे. टन एवढे झाले आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे मत्स्य उत्पादनातील हे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.


मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी सांगितले की, सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्याचे सागरी मत्स्योत्पान ६७,९०७ मे. टन होते. सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्याच्या सागरी मत्स्योत्पादनामध्ये ३,३९६ मे. टनने वाढ झाली असून हे मत्स्योत्पादन ७१,३०३ मे. टन एवढे झाले आहे. विभागामार्फत होणारी दिवस रात्र सागरी गस्त आणि ड्रोनद्वारे होणारी देखरेख यामुळे मासेमारीवर नियंत्रण येत असून कृत्रिम भित्तीका पाखरण तसेच खोल समुद्रातील मासेमारीमुळे मत्स्योत्पादनामध्ये वाढ झाल्याचे तावडे यांनी माहिती दिली.


ड्रोन कार्यप्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय नितेश राणे यांनी घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ९ जानेवारी २०२५ पासून ड्रोन कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली. तेव्हापासून या यंत्रप्रणालीद्वारे अनधिकृत मासेमारी नौकांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येत असून आजअखेर ३६७ अनधिकृत मासेमारी नौकांवर प्रतिवेदन दाखल करण्यात आले आहेत.


महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व सुधारणा (अध्यादेश), २०२१ अन्वये सन २०२४-२५ ते आजतागायत एकूण २९ एल. ई. डी. नौकांवर प्रतिवेदन दाखल करण्यात आले आणि त्यापैकी १८ प्रतिवेदन निकाली काढण्यात आली आहेत. त्यांच्याकडून ९० लाख ४० हजार रुपये एवढी शास्ती आकारण्यात आली आहे. पर्ससीन मासेमारीस १२ सागरी मैलाच्या बाहेर कोणताही निर्बंध नसून बहुतांश पर्ससीन मासेमारी ही १२ सागरी मैलाच्या बाहेरच होत असते, राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी करताना आढळून आल्यास त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.



‘ऑरेंज अलर्ट’ पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; आमदार निलेश राणे यांचे आवाहन


अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, आरोग्य आणि बचाव पथक तयार स्थितीत आहेत. दिनांक २४ मे रोजी संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, नागरिकांनी सतर्क राहावे. प्रवास टाळा आणि सुरक्षित ठिकाणी रहा. असे आवाहन कुडाळ-मालवण मतदारसंघ आमदार निलेश राणे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे