Salman Khanच्या घरात सलग दोन रात्री घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अज्ञात व्यक्तींना अटक

बॉलीवूडचा भाइजान सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये दोन दिवसांत दोघांनी घुसण्याचा प्रयत्न केला


मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा त्याला पुरविण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चेत आला आहे. कारण, बऱ्याच काळापासून सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, आणि आता सलग दोन दिवस वेगवेगळ्या व्यक्तींद्वारे सलमानच्या अपार्टमेंटमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची बातमी समोर येत आहे. ज्यात एका महिलेचा देखील समावेश आहे.  दरम्यान या दोन्ही अज्ञात व्यक्तींना मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे, ते सविस्तरपणे जाणून घेऊया.


गेल्या वर्षी १४ एप्रिल रोजी सलमानच्या घरावर दोन दुचाकीस्वार तरुणांनी गोळीबार (Salman Khan House Firing) केला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी ७ जणांना अटक केली होती. पण त्याचे जवळचे मित्र आणि राजकारणी बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमानच्या जीवाला धोका कायम असल्याचे लक्षात घेऊन, त्याला  Y प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली.



 Y प्लस सुरक्षा असूनही घुसखोरी


सलमान खानला वेळोवेळी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आजही येतच आहेत. त्यामुळेच, सलमान कुठेही जातो तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांचा ताफा त्याच्यासोबत असतो. सलमानच्या सुरक्षेबाबत मुंबई पोलिसही गंभीर आहेत आणि प्रशासनातील काही पोलिसही त्याच्यासोबत उपस्थित असतात.  मात्र इतकी सुरक्षा असून देखील सलमानच्या अपार्टमेंटमध्ये अशा पद्धतीने दोन अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे.



सलमान खानच्या घरात एका महिलेचा घुसण्याचा प्रयत्न 


मिळालेल्या माहितीनुसार, २० मे रोजी एका अज्ञात व्यक्तीने सलमान खानच्या अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षारक्षकांनी वेळीच पकडत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं .त्यानंतर लगेच बुधवारी(दि.२१) रात्री एका महिलेनेही सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. ईशा छाबडा असं या महिलेचे नावं असून बुधवारी सकाळीच मुंबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे. ईशा छाबडा या महिलेने पहाटे ३.३० वाजता सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. ती लिफ्टमधून सरळ सलमानच्या फ्लॅटपर्यंत पोहोचली. वरती असलेल्या सुरक्षारक्षकांनी तिला पकडलं.


याआधी मंगळवारी(दि.२०) एका व्यक्तीने सुरक्षारक्षकांना गुंगारा देत घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. कारच्या मागे लपून तो सलमानच्या इमारतीत घुसला. तेवढ्यात सुरक्षारक्षकांनी त्याला प्रवेश द्वाराजवळ  पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. जितेंद्र कुमार सिंह असं त्या व्यक्तीचं नाव होतं जो छत्तीसगढचा होता. यानंतर मुंबई पोलिस या दोन्ही घटनांची कसून चौकशी करत आहे.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती