यंदा सरासरीहून ७ ते १७ टक्के अधिक पाऊस, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली अपेक्षा

मुंबई: यावर्षी राज्यात सरासरीहून ७ ते १७ टक्के अधिक पाऊस पडण्याची अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. खरीप हंगामासंदर्भात आज, बुधवारी झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.


राज्यात आवश्यक बियाणे आणि खत उपलब्ध आहे. कुठले पीक कमी अधिक प्रमाणात घ्यायचं, याचा विचार करुनच बियाण देण्यात येईल, असे कृषी विभागाने सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


बोगस बियाणांचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्यायत. यावर्षीपासून केंद्र सरकारला विनंती करुन बियाणे साकी पोर्टलवर आणण्यात येणार आहे. टूथफूलतं 70 हजार क्विंटल बियाण साकी पोर्टलवर आहे. पुढच्यावर्षी 100 टक्के असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक कृषी कंद्राच्याबाहेर लिंक्ड इनचे व्यवस्थापन केले जाईल. लिंकइनचे प्रकार रोखले जातील. खते आपण सबसिडी म्हणून देतो. दुर्गम भागात सर्व वस्तू पोहोचतील. चांगला हंगाम असल्याने कीड व्यवस्थापन अतिशय महत्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यात डिजीटल शेतीशाळा आयोजित करण्यात येतील. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन कृषी विभागाकडून दिले जाईल. महा विस्तार ऍपमध्ये शेतीची सर्व माहिती उपलब्ध आहे. कुठली लागवड करायची, काय वापरले पाहिजे याचे सर्व व्हिडीओ पाहायला मिळतील. त्यात एक चॅटबोट असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील. हा चॅट बॉट लवकरच व्हॉट्सऍपवरदेखील आणणार असल्याचे फडणवीस म्हणाले.


यंदा राज्याने 204 लक्ष मेट्रीक टनाचे लक्ष्य ठेवलेय. चांगला मान्सून झाला तर कृषी भागाचा दर चांगला असतो. कृषीत गुंतवणूक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने फंड उपलब्धतेनुसार वस्तू मिळतील, अशी योजना करण्यात आली आहे. अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याआधी याची माहिती देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी