टाटा मोटर्सची ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज लाँच

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने ऑल-न्‍यू अल्‍ट्रोजच्‍या लाँचची घोषणा केली, जिची सुरूवातीची किंमत ६.८९ लाख रूपये आहे.


ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज स्‍लीक, शिल्‍पाकृती लाइन्‍स आणि आकर्षक ३डी फ्रण्‍ट ग्रिलसह आधुनिक आकर्षकतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. या वेईकलमधील फ्लोटिंग रूफ डिझाइन आणि आकर्षक डोअर हँडल्‍स तिच्‍या फ्यूचरिस्टिक अपीलमध्‍ये अधिक भर करतात, ज्‍यामुळे अल्‍ट्रोजला डायनॅमिक उपस्थिती मिळते, जी तिला सेगमेंटमध्‍ये वरचढ ठरवते. प्रिस्टिन व्‍हाइट, प्‍युअर ग्रे, रॉयल ब्‍ल्‍यू, अंबर ग्‍लो आणि ड्यून ग्‍लो या पाच आकर्षक रंगांमध्‍ये, तसेच स्‍मार्ट, प्‍युअर, क्रिएटिव्‍ह, अकॉम्‍प्‍लीश एस आणि अॅकॉम्‍प्‍लीश+ एस या विशिष्‍ट परसोनामध्‍ये उपलब्ध नवीन अल्‍ट्रोज टाटा मोटर्सच्‍या वैयक्तिककरणावरील फोकसशी बांधील आहे.


ऑल-न्‍यू टाटा अल्‍ट्रोजने आकर्षकता, आरामदायीपणा आणि नाविन्‍यतेच्‍या विनासायास संयोजनासह प्रीमियम हॅचबॅक डिझाइनला नव्‍या उंचीवर नेले आहे. या वेईकलच्‍या आकर्षक पुढील बाजूस लक्षवेधक ३डी ग्रिल, ल्‍यूमिनेट एलईडी हेडलॅम्‍प्‍स आणि सिग्‍नेचर इन्फिनिटी एलईडी कनेक्‍टेड टेल लॅम्‍प्‍स आहेत, ज्‍यामुळे वेईकल रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते. कूप-सारख्‍या सिल्‍हूटमध्‍ये फ्लोटिंग रूफ, शिल्‍पाकृती बॉडी लाइन्‍स आकर्षक डोअर हँडल्‍स आणि ड्रॅग-कट अलॉई व्‍हील्‍ससह अधिक आकर्षकतेची भर करण्‍यात आली आहे, ज्‍यामुळे स्‍टाइल व ऐरोडायनॅमिक्‍समध्‍ये वाढ झाली आहे. आतील बाजूस, केबिनच्‍या सुधारणेमधून नवीन बेंचमार्क दिसून येतो. ग्रँड प्रीस्टिजिया डॅशबोर्डसह सॉफ्ट-टच पृष्‍ठभाग, गॅलॅक्‍सी अॅम्बियण्‍ट लायटिंग आणि प्रीमियम ड्युअल-टोन बीज इंटीरिअर्स अत्‍याधुनिक टोन स्‍थापित करतात. एक्झिक्‍युटिव्‍ह लाऊंड-प्रेरित रिअर सीटिंगसह विस्‍तारित थाय सपोर्ट, फ्लॅट फ्लोअर आणि व्‍यापक ९०-अंश डोअर ओपनिंग्‍ज प्रभावी आरामदायीपणाची खात्री देतात, ज्‍यामुळे प्रत्‍येक प्रवास अत्‍यंत विशेष वाटतो.


नवीन अल्‍ट्रोजची खासियत म्‍हणजे विभागातील सर्वोत्तम डिजिटल अनुभव. हार्मनच्‍या १०.२५ इंच अल्‍ट्रा व्‍ह्यू इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टमसोबत फुल-डिजिटल एचडी १०.२५ इंच क्‍लस्‍टरसह रिअल-टाइम नेव्हिगेशन व्‍ह्यू आहे. इतर वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:


• ३६०० सराऊंड व्‍ह्यू कॅमेरासह ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर


• वॉईस-एनेबल इलेक्ट्रिक सनरूफ


• वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅप्‍पल कारप्‍ले


• वायरलेस चार्जिंग आणि ड्युअल ६५ वॅट टाइप सी फास्‍ट चार्जर्स


• एअर प्‍युरिफायर आणि भारतातील उन्‍हाळ्यासाठी एक्‍स्‍प्रेस कूलिंग


• आयआरए कनेक्‍टेड वेईकल टेक्‍नॉलॉजीसह ५० हून अधिक वैशिष्‍ट्ये


ऑल-न्‍यू अल्‍ट्रोज पेट्रोल, डिझेल, सीएनजी या पॉवरट्रेन्‍सच्‍या सर्वसमावेशक श्रेणीमध्‍ये, तसेच डीसीए व एएमटी ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन्‍समध्‍ये ऑफर करण्‍यात आलेली भारतातील एकमेव प्रीमियम हॅचबॅक आहे. यामधून शहरातील प्रभावी प्रवासासाठी उत्‍साहवर्धक ड्राइव्‍ह अनुभवाची खात्री मिळते.


• १.२ लिटर रेवोट्रॉन पेट्रोल (मॅन्‍युअल, डीसीए व नवीन एएमटी) - सुधारित ड्रायव्हिंगक्षमतेसह वैविध्‍यपूर्ण ट्रान्‍समिशन पर्याय


o १.२ लिटर आयसीएनजीसह ट्विन-सिलिंडर टेक - भारतातील सर्वात प्रगत सीएनजी सिस्‍टमसह एैसपैस बूट स्‍पेस आणि प्रीमियम वैशिष्‍ट्ये


• १.५ लिटर रेवोटॉर्क डिझेल - भारतातील एकमेव डिझेल हॅचबॅक, जी उच्‍च टॉर्क आणि महामार्गावर प्रभावी क्रूझिंग देते.


सोयीसुविधा, कार्यक्षमता किंवा रोमांचपूर्ण ड्रायव्हिंगचा आनंद घ्‍यायचा असो अल्‍ट्रोज सर्वकाही देते, ज्‍यामुळे अस्‍सल सेगमेंट लीडर आहे.


विश्‍वसनीय अल्‍फा आर्किटेक्‍चरवर निर्माण करण्‍यात आलेल्‍या अल्‍ट्रोजने भारतातील सर्वात सुरक्षित प्रीमियम हॅचबॅक असण्‍याचा वारसा कायम ठेवला आहे. सुरक्षितता वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे:


• ६ एअरबॅग्‍ज आणि प्रमाणित म्‍हणून ईएसपी


• डायमंड स्‍ट्रेन्‍थ सेफ्टी शील्‍ड - सुधारित रचनात्‍मक प्रबळतेसह सुधारित क्रम्‍पल झोन्‍स


• एसओएस कॉलिंग फंक्‍शन (ई-कॉल/बी-कॉल)


• ISOFIX माऊंट्स, हिल होल्‍ड असिस्‍ट, एलईडी फॉग लॅम्‍प्‍ससह कॉर्नरिंग

Comments
Add Comment

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण