वॉशिंग्टनमध्ये गोळीबार, इस्रायलच्या दूतावासातील दोघे ठार

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेच्या राजधानीचे शहर असलेल्या वॉशिंग्टन डी. सी. येथील ज्यू संग्रहालयाजवळ झालेल्या गोळीबारात इस्रायलच्या दूतावासातील दोन कर्मचारी ठार झाले. होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी ही माहिती दिली. मेट्रोपोलिटन पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला अटक केली आहे. गोळीबारात एक पुरुष आणि एक महिला अशा दोन जणांचा मृत्यू झाल्याचे मेट्रोपोलिटन पोलिसांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोळीबाराच्या घटनेचा निषेध केला.

ट्रम्प यांनी 'ट्रूथ सोशल'वर पोस्ट करुन गोळीबाराचा निषेध केला. 'वॉशिंग्टन डी. सी. येथील हत्याकांड हे भयानक आहे. यहुदी विरोधी भावनेतून गोळीबार झाला आहे. हे प्रकार आता थांबलेच पाहिजे. अमेरिकेत द्वेष आणि कट्टरतेला स्थान नाही. पीडितांच्या कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. देव त्यांना हे दुःख सहन करण्याची देवो. ' अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी 'ट्रूथ सोशल'वर पोस्ट करुन दिली.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेतील गोळीबाराची घटना धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच इस्रायलच्या जगभरातील सर्व दूतावासांच्या संरक्षणात वाढ करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
Comments
Add Comment

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या

इस्त्रायलचा गाझावर हल्ला, ६ ठार

गाझा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा पट्टीत शांतता नांदावी म्हणून गाझा पीस प्लॅनची घोषणा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या

'या' तारखेपासून विंडोज १०चा सपोर्ट होणार बंद

वॉशिंग्टन डीसी :  टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जगभरात मोठ्या

अमेरिकेच्या गाझा शांतता योजनेशी हमास सहमत

वॉशिंग्टन : पॅलेस्टिनी मिलिशिया गट हमासने अमेरिकेच्या गाझा शांतता प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. शांतता

सरकारी निधी थांबल्यामुळे नासातही शटडाऊन

वॉशिंग्टन : अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च टॅरिफ लावले असताना, त्यांच्या