पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुनर्विकसित १०३ स्थानकांचे उद्घाटन

  94

बिकानेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिकानेरमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एकाचवेळी देशातील पुनर्विकसित केलेल्या १०३ रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ८६ जिल्ह्यांमध्ये ही १०३ रेल्वे स्थानके आहेत. यात महाराष्ट्रातील पंधरा स्थानके आहेत.



अमृत भारत योजनेंतर्गत महाराष्ट्रातील आमगाव, चांदा फोर्ट, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड व वडाळा रोड या स्थानकांचा कायापालट करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुनर्विकसित केलेल्या १०३ रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात महाराष्ट्रातील मुंबईच्या परळ स्थानकातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी अमृत भारत योजनेतील कामाचे कौतुक केले. तसेच या योजनेसाठी पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

सरकारने राबवलेल्या अमृत भारत योजनेत रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात आला. प्रवाशांकरिता सुखसोयींची व्यवस्था करण्यात आली. रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागाचे रुपडे पालटताना स्थानिक भागात कोणत्या संस्कृतीचा अथवा परंपरेचा प्रभाव आहे का याचा प्रधान्याने विचार करण्यात आला. रेल्वे स्थानकात प्रवाशांना विविध प्रकारची माहिती देण्यासाठी सहज दिसतील आणि पटकन वाचून समजतील असे डिस्प्ले बोर्ड आणि इंडिकेटर ठिकठिकाणी बसवण्यावर भर देण्यात आला. स्थानकात येण्याजाण्याचे मार्ग तसेच स्थानकातील जिने - पादचारी पूल, लिफ्ट, एस्कलेटर हे सर्व प्रशस्त करुन प्रवाशांची सोय करण्यात आली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिला आणि पुरुषांसाठीची स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही, सार्वजनिक घोषणा प्रणाली या सर्व व्यवस्थांचे आधुनिकीकरण करण्यात आले. वृद्ध आणि दिव्यांगांसाठी स्थानकावर ठिकठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानकाजवळ प्रशस्त वाहन तळ उभारण्यात आले. प्रचंड गर्दीच्या स्थानकांवर फूड कोर्ट, किओस्क, रिटेल आऊटलेटची विशेष व्यवस्था करण्यात आली. लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या स्थानकांवर थांबतात तिथे प्रतीक्षालय, बसण्याची प्रशस्त जागा, प्रकाशयोजना, वायुवीजन, स्वच्छता यावर प्रचंड भर देण्यात आला आहे.

केंद्र सरकार अमृत भारत योजनेत देशातील १३०० पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करत आहे. याच योजनेंतर्गत १०३ स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम करण्यात आले आहे. या स्थानकांचे एकाचवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले.

अमृत भारत योजनेअंतर्गत प्रादेशिक वास्तुकला प्रतिबिंबित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी डिझाइन केलेल्या १,३०० हून अधिक स्थानकांचा पुनर्विकास आधुनिक सुविधांसह केला जात आहे. करणी माता मंदिरात येणाऱ्या यात्रेकरू आणि पर्यटकांना सेवा देणारे देशनोके रेल्वे स्थानक मंदिर वास्तुकला आणि कमान आणि स्तंभ थीमने प्रेरित आहे. तेलंगणातील बेगमपेट रेल्वे स्थानक काकतिया साम्राज्याच्या स्थापत्यकलेपासून प्रेरित आहे. बिहारमधील थावे स्थानकात ५२ शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माँ थवेवलीचे प्रतिनिधित्व करणारे आणि मधुबनी चित्रांचे चित्रण करणारे विविध भित्तिचित्रे आणि कलाकृतींचा समावेश आहे. गुजरातमधील डाकोर स्थानक रणछोदराई जी महाराजांपासून प्रेरित आहे. भारतातील पुनर्विकसित अमृत स्थानकांमध्ये सांस्कृतिक वारसा, दिव्यांगजनांसाठी असलेल्या प्रवाशां-केंद्रित सुविधांसह आधुनिक पायाभूत सुविधा आणि प्रवासाचा अनुभव वाढविण्यासाठी शाश्वत पद्धतींचा समावेश आहे.
Comments
Add Comment

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Kulgam Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये आणखी एक दहशतवादी ठार, आठवड्याभरात दुसरी चकमक

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातील अखल गावात शुक्रवारी रात्री झालेल्या