Shrikant Shinde: शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारताचे शिष्टमंडळ पोहोचले मुस्लिम देशात

अबूधाबी:  शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नेतृत्वाखालील भारताचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ (All Party Delegation Team), 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) चा संदेश घेऊन मुस्लिम बहुल देश UAEमध्ये पोहोचले.  जिथे जाण्याचा त्यांचा उद्देश यशस्वीरित्या पूर्ण झाला असून, दहशतवाद विरुद्ध पुकारलेल्या या मोहिमेत UAE ची भारतासोबत वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली आहे.


दहशतवादाविरुद्ध भारताचे धोरण आणि ऑपरेशन सिंदूर यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ अबू धाबी, UAE येथे पोहोचले आहेत. त्यांनी युएईच्या अधिकाऱ्यांसोबत फलदायी बैठका घेतल्या, ज्यामध्ये युएईची भारताप्रती असलेली वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली आहे. युएईने भारताला दहशतवादविरुद्ध कार्यात सहकार्य करण्याचे वचन दिले आहे.


या बैठकीत काय निर्णय झाला, याबद्दल माहिती देताना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, "आमची UAE समकक्षांसोबतची बैठक ही सार्थकी ठरली आहे. आम्ही संरक्षण समितीचे अध्यक्ष अली रशीद अल नुआमी आणि सहिष्णुता मंत्री शेख नाह्यान यांना भेटलो. UAE दहशतवादाविरुद्ध पूर्ण वचनबद्धतेने भारतासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे. युएईने दिलेला संदेश स्पष्ट होता- आम्ही दहशतवादाविरुद्ध लढ्यात भारतासोबत उभे आहोत, आणि दहशतवादाविरुद्ध दोन हात करत आहोत. मला वाटते की हा एक अतिशय महत्त्वाचा संदेश आहे."


शिवसेना खासदार पुढे म्हणाले की, "UAE मध्ये जी शांतता आणि समृद्धी आहे, तसेच UAE मध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या, सुरक्षित वाटणाऱ्या भारतीयांची संख्या आणि UAE ज्या पद्धतीने पुढे जात आहे, ते पाहता मला असे वाटते की यूएईसारख्या देशाने या कठीण काळात भारतासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहणे खूप महत्वाचे आहे. UAE च्या समकक्षांकडून संदेश अगदी स्पष्ट आहे की आम्ही या दहशतवादाविरुद्ध तुमच्यासोबत आहोत. कोणत्याही धर्माच्या नावाखाली दहशतवादाला खतपाणी देता येऊ शकत नाही, असे दोन्ही मंत्र्यांच्या संदेशात स्पष्ट झाले आहे. "



'दहशतवादाने मानवतेवर हल्ला केला आहे'- श्रीकांत शिंदे




"दहशतवादाचा संबंध केवळ भारताशी नाही, तर मानवतेशी आहे, आणि हाच संदेश जगभरात पोहोचवणे गरजेचा आहे. दोन्ही देशांसाठी आणि शेजारील राष्ट्राच्या प्रगतीसाठी देखील हे महत्वाचे असून,  भारतावरील हल्ल्याचा निषेध करणारा युएई हा पहिला देश आहे..." असे श्रीकांत शिंदे यांनी पुढे सांगितले.



मुस्लिम बहुल देश अबूधाबीने दहशतवादविरुद्ध दिला हा संदेश




UAE फेडरल नॅशनल कौन्सिलच्या संरक्षण, अंतर्गत आणि परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष डॉ. अली रशीद अल नुआमी म्हणाले, "दहशतवादाला कोणताही धर्म किंवा राष्ट्रीयत्व नसते. तो संपूर्ण मानवतेसाठी धोका आहे." ते पुढे असे देखील म्हणाले की, "दहशतवाद हा केवळ एका राष्ट्रासाठी किंवा प्रदेशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे. आमचा असा विश्वास आहे की आंतरराष्ट्रीय समुदायाने, विशेषतः संसद सदस्यांनी, एकत्र येऊन चांगले भविष्य घडविण्यासाठी रणनीती आखली पाहिजे आणि एकत्र काम केले पाहिजे. ही बैठक दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढण्याचा आणि आपल्या नागरिकांसाठी आणि प्रदेशासाठी चांगले भविष्य सुनिश्चित करण्याचा आमचा संकल्प प्रतिबिंबित करते."

Comments
Add Comment

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली