जामखेड तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाच्या सरी

जामखेड : जामखेड तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाच्या सरी व विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्याने तालुक्यातील जवळा, हाळगाव परिसरात फळबागाचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे तालुक्यात बीज गायब झाली आहे. मे महिन्यात तब्बल पाच दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यात शेती, फळबागा आणि जनजीवन पावर परिणाम झाला आहे. आज दिवसभरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडली असून काही गावांचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. शेतात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य दिसत आहे. खासकरून फळबागांना मोठा तडाखा बसला असून जवळा, हळगाव, पिंपरखेड, फक्राबाद, मतेवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे लिंबोणीच्या झाडे उन्मळून पडली आहेत.यामुळे बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

कांदा उत्पादकांनाही या पावसाचा फटका बसला आहे.चौंडी गावात अक्षय सत्यवान सोनवणे यांच्या चालू असलेल्या घरकुलाच्या बांधकामाची भिंत कोसळली. या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी शासकीय मदतीची मागणी केली आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या