गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! लवकरच जलवाहतूक सेवा

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाचा प्रवास अधिक सुखकर ठरणार आहे. मुंबईतील माझगावपासून मालवण, विजयदुर्ग, रत्नागिरीपर्यंतच्या किनारी मार्गावर जलवाहतूक सेवा लवकरच सुरू होणार आहे.

नितेश राणे यांच्या संकल्पनेतून हायटेक बोट सेवा सुरू


मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून माझगावपासून मालवण, विजयदुर्ग आणि रत्नागिरी  या मार्गावर प्रवासी बोट सेवा सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'एम टू एम' नावाची हायटेक बोट २५ मे रोजी भाऊचा धक्का येथे दाखल होणार आहे.

अगदी काही तासांत गाठता येणार गाव


जलवाहतूक सेवेच्या माध्यमातून मुंबई ते रत्नागिरी अंतर अवघ्या ३ तासांत, तर मालवण आणि विजयदुर्ग अंतर ४.५ तासांत गाठता येणार आहे. ही सेवा सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोकणात जाताना पावसामुळे होणारी गैरसोय, रस्त्यांची खराब अवस्था आणि वाहतूक कोंडी या त्रासाचा सामना करावा लागत असल्यामुळे चाकरमान्यांना ही जलसेवा मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
Comments
Add Comment

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून जादा गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर

मालाडमधील फोर डायमेंशन इमारतीला आग

मुंबई: मालाड पश्चिम येथील माइंडस्पेसजवळ लिंक रोडवरील फोर डायमेंशन बिल्डिंगमध्ये शुक्रवारी आग लागली. मुंबई

मुंबईच्या काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार!

प्रेमभंगातून तरुणाचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला, नंतर स्वतः केली आत्महत्या मुंबई : मुंबईतील काळाचौकी भागात एक खूप

हातपाय बांधले आणि चोर समजून तरुणाला मरेपर्यंत मारले

मुंबई : चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण मुंबईतील गोरेगावमध्ये काही प्रमाणात खरी ठरली. गोरेगावच्या तीन डोंगरी