मुंबईतील नागरी सुविधांची दुरवस्था

  29

मुंबई :मुंबई महापालिकेच्या कोट्यवधींच्या अर्थसंकल्पाच्या सावलीत राहणाऱ्या सामान्य मुंबईकरांसाठी नागरी सेवा अजूनही मोठ्या प्रमाणात अपुऱ्या आहेत. प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून पाणी, सांडपाणी, शौचालय, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण यासारख्या मूलभूत सेवांची दुरवस्था समोर आली आहे. अहवालानुसार, मुंबईत दर चार सार्वजनिक शौचालयांमागे फक्त एक शौचालय महिलांसाठी आहे. स्वच्छ भारत अभियानानुसार एका शौचालयाचा वापर ३५ पुरुष आणि २५ महिलांनी होणे अपेक्षित आहे, मात्र मुंबईत एका शौचालयावर सरासरी ८६ लोकांचा भार आहे. तसेच ६९% शौचालयांत पाणी आणि ६०% शौचालयांत वीज नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


मुंबईत दररोज ४,३७० एमएलडी पाणी मिळते, पण गळतीमुळे केवळ ३,९७५ एमएलडी वापरासाठी उरते. झोपडपट्टीतील रहिवाशांना दरडोई केवळ ४५ एलपीसीडी पाणी मिळते, तर शहरातील उर्वरित भागात १३५ एलपीसीडी. झोपडपट्टीवासीयांना उर्वरित पाणी टँकरद्वारे विकत घ्यावे लागते, ज्यासाठी दरमहा सुमारे रु. ७५० खर्च येतो. मुंबईतील आठ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांपैकी सहा केंद्रे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांवर अपयशी ठरली आहेत.२०२४ मध्ये मुंबईत २४.३७ लाख मेट्रिक टन कचरा संकलित झाला. देवनार आणि कांजूरमार्ग डंपिंग ग्राउंडवरच याची विल्हेवाट लावली जाते. २०२४ मध्ये नागरी सुविधांसंदर्भात एकूण १.१५ लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, २०१५ च्या तुलनेत यात ७०% वाढ झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक तक्रारी कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा आणि प्रदूषण विषयक होत्या. प्रजाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के म्हणाले, की "मुंबई महापालिकेचा भव्य अर्थसंकल्प असूनही सेवांचे वितरण अपुरे आहे.

Comments
Add Comment

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने