मुंबईत वाहनमालकांमध्ये विशेष नोंदणी क्रमांकांची मागणी वाढली

मुंबई:अनेकांना कार किंवा दुचाकी असणे हे केवळ ब्रँड किंवा मॉडेलबद्दल नाही, तर वैयक्तिक पसंती, भाग्यवान अंक दर्शविणारा नोंदणी क्रमांकदेखील असतो. त्यामुळे फॅन्सी नंबरबाबतचे हे वाढते आकर्षण राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत ठरत आहे. जानेवारी ते डिसेंबर २४ या कालावधीत मुंबईतील ताडदेव, वडाळा, बोरिवली आणि अंधेरी या चार आरटीओमधून तब्बल ३२ हजार ८२१ फॅन्सी नंबरची विक्री झाली. त्यातून परिवहनच्या तिजोरीत ४३ कोटी ९२ लाख ६ हजारांचा महसूल जमा झाला.

यातील बरेच जण वाहन डीलरशिपला भेटण्यापूर्वीच क्रमांक सुरक्षित करण्यासाठी मोठी रक्कम देण्यास तयार असतात. फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी परिवहन संकेतस्थळावर जाऊन मोबाइल आणि ई-मेलच्या मदतीने ओटीपी मिळवून रजिस्ट्रेशन करावे लागते. एका क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यास बहुतेकदा बोली प्रक्रियेद्वारे सर्वाधिक रक्कम देणाऱ्या अर्जदाराला तो क्रमांक दिला जातो.

६ लाख रुपये मोजा
०००१ या क्रमांकासाठी मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक या शहरांमध्ये सहा लाख रुपये मोजावे लागत आहेत.
Comments
Add Comment

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार