Jayant Narlikar Death: ज्येष्ठ खगोल शास्रज्ञ जयंत नारळीकर यांनी ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे: जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत नारळीकर (Jayant Narlikar) यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. भारतीय खगोलशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नारळीकरांनी सामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्याचे कार्यही अविरतपणे केले.


चार दशकाहून अधिक कालावधीपासून जयंत नारळीकर यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर त्यांनी अनेक पुस्तकं देखील लिहिली आहेत. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याचप्रमाणे डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली. असे हे मराठमोळे शास्त्रज्ञ वृद्धापकाळामुळे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्यांच्या पश्चात गीता, गिरिजा व लीलावती या तीन मुली आहेत.


जयंत नारळीकर यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद भूषवले आहे. तसेच १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली होती.


जयंत नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ तर त्यांचीआई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. तर त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर गणितज्ञ होत्या. ज्यांचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. प्रतिष्ठित सांख्यिकीशास्त्रज्ञ व्ही. एस. हुजुरबाजार हे जयंत नारळीकर यांचे मामा होते. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.


Comments
Add Comment

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील

घरगुती ग्राहकांसाठी प्रीपेड मीटर नाही : मुख्यमंत्री

नागपूर : राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. मात्र, सामान्य

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका