मुंबईत आजपासून कुठलेही काँक्रिटीकरण नको

  32

उपनगराचे पालकमंत्री अॅड. शेलार यांचे निर्देश 


मुंबई (प्रतिनिधी): मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सोमवारपासून तिसऱ्यांदा सुरू केली असून, या पश्चिम उपनगरातील पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणच्या अपूर्ण रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, २० मे नंतर कोणतेही नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करू नये, ३१ मे पर्यंत रस्ते वाहतूक योग्य करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिले.


मंगळवारी रस्ते पाहणीच्या या दौऱ्यादरम्यान वांद्रे पश्चिम येथील १४ व्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून, रस्ता पूर्णपणे खोदून ठेवलेला असल्याचे निदर्शनास आले. कांदिवली येथील न्यू लिंक रोड आणि डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशन परिसरातील रस्त्यांचे अपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी दिले. मालाड पूर्व येथील गोविंदभाई श्रॉफ रोड ते एस. व्ही. रोडपर्यंतच्या रस्त्यांच्या क्यूरींगचे काम पूर्ण झाले असून, हा रस्ता काही दिवसांत वाहतुकीसाठी खुला होईल असेही त्यांनी सांगितले. दहिसर पश्चिम येथील रंगनाथ केसकर महामार्ग आणि रिव्हर व्हॅली रोडला जोडणाऱ्या दहिसर नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार मनिषा चौधरी यांनी दहिसर परिसरातील अपूर्ण कामांची यादी अधिकाऱ्यांसमोर सादर केली.


रस्त्यांच्या दुरुस्ती व विकासाच्या कामावर आमचा सतत पाठपुरावा सुरू असून मंत्री आशिष शेलार यांचा हा पावसाळ्यापूर्वी रस्ते पाहणीचा तिसरा दौरा आहे. आता नवीन रस्ता खोदू नका, २० मे नंतर काँक्रीटीकरण करणे थांबा, कारण पावसाळ्याच्या तोंडावर केलेली तात्पुरत्या कामांमुळे रस्ते पुन्हा उखडण्याचा धोका असतो. ३१ मे २०२५ पर्यंत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करा, जे रस्ते खोदून ठेवले आहेत, त्याचे डांबरीकरण करुन ते वाहतूकीस खुले होतील असे करा, डांबरीकरण करताना ते रस्ते पावसाळ्यात उखडून खड्डे पडणार नाहीत याची काळजी घ्या, तसेच, गटारांमध्ये गेले डेब्रिज आणि मातीही काढा, अशा सूचना यावेळी मंत्री शेलार यांनी दिल्या.


रस्त्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, आमदार विद्या ठाकूर, आमदार मनिषा चौधरी, माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला, जितेंद्र पटेल आणि स्थानिक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई