मुंबईत आजपासून कुठलेही काँक्रिटीकरण नको

उपनगराचे पालकमंत्री अॅड. शेलार यांचे निर्देश 


मुंबई (प्रतिनिधी): मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सोमवारपासून तिसऱ्यांदा सुरू केली असून, या पश्चिम उपनगरातील पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणच्या अपूर्ण रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, २० मे नंतर कोणतेही नवीन सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करू नये, ३१ मे पर्यंत रस्ते वाहतूक योग्य करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिले.


मंगळवारी रस्ते पाहणीच्या या दौऱ्यादरम्यान वांद्रे पश्चिम येथील १४ व्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून, रस्ता पूर्णपणे खोदून ठेवलेला असल्याचे निदर्शनास आले. कांदिवली येथील न्यू लिंक रोड आणि डहाणूकरवाडी मेट्रो स्टेशन परिसरातील रस्त्यांचे अपूर्ण काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री आशिष शेलार यांनी दिले. मालाड पूर्व येथील गोविंदभाई श्रॉफ रोड ते एस. व्ही. रोडपर्यंतच्या रस्त्यांच्या क्यूरींगचे काम पूर्ण झाले असून, हा रस्ता काही दिवसांत वाहतुकीसाठी खुला होईल असेही त्यांनी सांगितले. दहिसर पश्चिम येथील रंगनाथ केसकर महामार्ग आणि रिव्हर व्हॅली रोडला जोडणाऱ्या दहिसर नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार मनिषा चौधरी यांनी दहिसर परिसरातील अपूर्ण कामांची यादी अधिकाऱ्यांसमोर सादर केली.


रस्त्यांच्या दुरुस्ती व विकासाच्या कामावर आमचा सतत पाठपुरावा सुरू असून मंत्री आशिष शेलार यांचा हा पावसाळ्यापूर्वी रस्ते पाहणीचा तिसरा दौरा आहे. आता नवीन रस्ता खोदू नका, २० मे नंतर काँक्रीटीकरण करणे थांबा, कारण पावसाळ्याच्या तोंडावर केलेली तात्पुरत्या कामांमुळे रस्ते पुन्हा उखडण्याचा धोका असतो. ३१ मे २०२५ पर्यंत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करा, जे रस्ते खोदून ठेवले आहेत, त्याचे डांबरीकरण करुन ते वाहतूकीस खुले होतील असे करा, डांबरीकरण करताना ते रस्ते पावसाळ्यात उखडून खड्डे पडणार नाहीत याची काळजी घ्या, तसेच, गटारांमध्ये गेले डेब्रिज आणि मातीही काढा, अशा सूचना यावेळी मंत्री शेलार यांनी दिल्या.


रस्त्यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, आमदार विद्या ठाकूर, आमदार मनिषा चौधरी, माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, माजी नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला, जितेंद्र पटेल आणि स्थानिक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ

Kalyan and Badlapur Power Blocks : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवर उद्या आणि परवा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स

मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता