भाईंदर, मिरारोड रेल्वे स्थानकाची प्रलंबित कामे पूर्ण करा

खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना



ठाणे : खासदार नरेश म्हस्के यांनी सोमवारी भाईंदर आणि मिरारोड रेल्वे स्टेशनची पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच काही कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण करावीत असे निर्देश दिले. मिरारोड आणि भाईंदर रेल्वे स्टेशनवरील प्रलंबित कामांसंदर्भात डीआरएम पंकज सिंग आणि वेस्टर्नचे जीएम अशोक मिश्रा यांच्याबरोबर खासदार नरेश म्हस्के हे शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर आणि उत्तर भारतीय नेते विक्रम प्रताप सिंग यांच्यासमवेत गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. ती कामे आता जलदगतीने सुरू झाल्याबद्द्ल खासदार नरेश म्हस्के यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान समाधान व्यक्त केले.
खासदार नरेश म्हस्के यांनी प्रथम भाईंदर पूर्व आणि पश्चिम भागाला भेट दिली. एक्सलेटर व छताच्या कामाची पाहणी केली. स्वछतागृहाची समस्या तसेच काही कामांसंदर्भात अडचणी, कामांना उशीर केला होत असल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी डीआरएम यांच्याशी मोबाईल वरुन संवाद साधत कामे लवकर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.


खासदार नरेश म्हस्के यांनी पूर्ण रेल्वे स्टेशनची पाहणी केली. दोन्ही बाजूची पार्किंगची समस्या जाणून घेतली. प्रवाशांशी चर्चा केली. तृतीयपंथी व्यक्ती आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्यांपासून महिलांना जो त्रास होत आहे याबाबत पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांच्याशी चर्चा केली. तसेच रेल्वे पोलिस यांनाही फैलावर घेऊन दोघांनी एकमेकाच्या सहकार्याने प्रवाशांच्या समस्या दूर करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. खासदार नरेश म्हस्के यांनी भाईंदर ते मीरारोड रेल्वेने प्रवास करून प्रवाशांशी चर्चा केली. मिरारोड रेल्वे स्टेशनला येऊन तेथील पाहणी केली. अचानकपणे या ठिकाणच्या टॉयलेटची पाहणी करून खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केले. या कामाबद्दल मिरा रोड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर नरेश प्रसाद यांचा यावेळी सत्कार केला.


खासदार नरेश म्हस्के यांनी पूर्ण स्टेशनची पाहणी केली आणि सर्वसंबंधित अधिकारी, प्रकल्प अधिकारी, रेल्वेचे अधिकारी, अभियंते, दोन्ही स्टेशनला जबाबदार असणारे अधिकारी आणि स्टेशन मास्टर यांच्यासमवेत बैठक आयोजित करून तातडीचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी निर्देश दिले. लोकांना चांगल्या सुविधा कशा मिळतील या संदर्भात त्यांना सूचना केल्या. राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्याना भाईंदर आणि मीरा रोड स्टेशन येथे थांबा मिळावा अशी येथील प्रवाशांची मागणी असून या मागणीचा विचार करण्याची सुचना यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली.


यावेळी एजीएम अनिल करवंदे, डीईई एमआरव्हीसी विनेशकुमार शर्मा, भाईंदर रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर भारती राजविर, उप अभियंता राजकुमार शर्मा, आरपीएफ पीआय परीमल वानखेडे, मिरारोड स्टेसन मास्टर नरेश प्रसाद, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, भाईंदर विधानसभा शहरप्रमुख विक्रम प्रताप सिंग, उपजिल्हाप्रमुख जयराम मेसे, उत्तर भारतीय जिल्हाप्रमुख विद्याशंकर चतुर्वेदी, राजस्थान सेल जिल्हाप्रमुख कपिल परमार, उपजिल्हाप्रमुख रामभुवन शर्मा, उपशहरप्रमुख जावेद शेख, शाखाप्रमुख महेश शिंदे व अंकित शहा, उपशहरप्रमुख उबेद शेख व सतिश सिंग, जिल्हा सचिव सुभाष यादव, विभागप्रमुख इम्रान खलिफा, माजी नगरसेविका शर्मिला बगात्री, उपशहरप्रमुख संकेत पाटील, शाखाप्रमुख समीर खान आणि शॉन इतूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मिरा-भाईंदर महापालिकेचे इलेक्शन गणित ठरले! ९५ पैकी ४८ जागांवर महिलांना संधी

ओबीसीच्या २५ जागा; 'या' प्रभागांत दोन महिला नगरसेविका निवडल्या जाणार भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी

नवी मुंबईच्या निवडणुकीसाठी 'सीट फिक्स'! १११ पैकी ५६ जागांवर महिलांचे वर्चस्व

SC साठी ५, ST साठी १ जागा महिलांसाठी राखीव; इच्छुकांचे धाबे दणाणले! नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या (NMMC) आगामी

ठाण्यात 'आरक्षण लॉटरी' फुटली! कोणाचा पत्ता कट, कोणाला संधी?

३३ प्रभागांत १३१ नगरसेवक निवडले जाणार! ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांना ज्या क्षणाची उत्सुकता

ढोकाळीतील ५० वर्षे जुने मंदिर गायब!

तक्रार नोंदविण्यास पोलीसांची टाळाटाळ ठाणे  : ढोकाळी येथील हायलँड पार्क रोड येथे असलेले ५० वर्षे जुने कुलदैवताचे

मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी उद्या होणार सुनावणी, अभियंत्यांची चूक नाही असा वकिलांचा दावा!

ठाणे: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या अभियंत्यांबाबत मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी अटकपूर्व

तानसा अभयारण्यासह परिसरात २३ प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन

शहापूर : अडई, हरिद्र, कोतवाल, शिंपी, वेडा राघू, नदीसुरय, तिसा अशा एक ना अनेक रंगबिरंगी विहंगांचा मुक्त विहार