विराट कोहलीला भारतरत्नाने सन्मानित केले पाहिजे- सुरेश रैना

बंगळूरू : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावर सोशल मीडियावर अद्याप प्रतिक्रिया उमटत आहे. विराट कोहलीला सन्मानाने निवृत्ती मिळायला हवी होती, अशी नाराजी सर्वांनी व्यक्त केली. त्यातच विराट कोहलीला भारतरत्न मिळालायला हवा, अशी मागणी चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैना याने केली आहे. सुरेश रैनाच्या वक्तव्यानंतर विराट कोहली आणि भारतरत्न सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.


भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैनाने विराट कोहलीला भारत रत्न देण्याची मागणी केली आहे. शनिवार(दि. १७) आयपीएलमधील आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान सुरेश रैनाने लाईव्ह टीव्हीवर चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला.कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेनंतर रैनाने त्याला सन्मानित करण्यासाठी हा सल्ला दिला आहे. सुरेश रैना म्हणाला की , 'विराट कोहलीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्याने भारत आणि भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले, त्यासाठी त्याला भारतरत्नाने सन्मानित केले पाहिजे. भारत सरकारने त्याला हा सर्वोच्च सन्मान द्यावा.'


भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीने १२ मे रोजी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएल सुरू असतानाच विराट कोहलीने इन्स्टाग्राम पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. किंग कोहलीला मैदानावर शानदार निरोप मिळेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. परंतु त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. विराट कोहलीला भारतरत्न मिळणार की नाही, हे येत्या काळात स्पष्ट होईल. कोहलीच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेत सरकार ही मागणी कितपत गांभीर्याने घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोहलीच्या चाहत्यांमध्येही या मागणीला पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीला भारतरत्न देण्यात यावा, या मागणीने जोर धरला आहे.


भारतीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंत फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला भारत रत्न मिळाला आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने सचिनला भारत रत्न देण्याची शिफारस केली होती आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी हा सन्मान प्रदान केला. विशेष म्हणजे, खेळाडूंना भारत रत्न देण्याचा कोणताही नियम त्यावेळी नव्हता. सचिनसाठीच प्रथम नियमांत बदल करण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला हा सन्मान मिळालेला नाही.

Comments
Add Comment

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे