Solapur Textile Fire: सोलापूरमधील टेक्सटाईल कारखान्यातील मृतांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची मदत

सोलापूर: सोलापुर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील एका टेक्सटाईल कारखान्याला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये  तब्बल 8 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  या दुर्दैवी घटनेची दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देणार असल्याचे जाहीर केले आहे.


अक्कलकोट एमआयडीसीतील कारखान्याला लागेल्या आगीच्या धुराने अख्ख्या सोलापूरवासीयांच्या डोळ्यात पाणी आले.  या दुर्घटनेत 8 निष्पापांचा जीव गेला असून त्यात एक वर्षाच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे.



मालकासह कुटुंबातील 5 आणि 3 कामगारांचा होरपळून मृत्यू  


नरसंहार ठरलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी टेक्सटाईल कारखान्याचे मालक उस्मान मनसुरी आपल्या कुटुंबीयांसोबत वरच्या मजल्यावरील मास्टर बेडरुममध्ये लपून बसले होते. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत कुटुंबातील 5 निष्पाप जणांचा आणि कंपनीतील तीन कामगारांचा आगीत होरपळून  मृत्यू झाला. शोधकार्य सुरु असतानच या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व आठही मृतदेह हे सर्व विच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत.



मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांना 5 लाख रुपयांची मदत


सोलापुरमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 8 जणांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.


मृतांची नावे


सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मनसुरी (वय 87)


अनस मनसुरी (वय 24)


शीफा मनसुरी (वय24)


युसूफ मनसुरी (वय 1.6)


आयेशा बागबान (वय 38)


मेहताब बागवान (वय 51)


हिना बागवान (वय 35)


सलमान बागवान (वय 38)

Comments
Add Comment

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध