हैदराबाद : चारमिनारजवळ गुलजार हाऊसला आग, १७ जणांचा मृत्यू

हैदराबाद : हैदराबादच्या चारमिनार परिसरातील गुलजार हाऊस इमारतीला रविवारी सकाळी आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

रविवार १८ मे रोजी पहाटे साडेपाच वाजता चारमिनारजवळील गुलजार हाऊस इमारतीत दागिन्यांच्या दुकानाला आग लागली. ही आग झपाट्याने पसरली. गुलजार हाऊसमध्ये फायर एक्झिट नसल्यामुळे इमारतीत असलेले अडचणीत सापडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तातडीने आग आटोक्यात आणण्याची कारवाई सुरू झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेची माहिती मिळताच शोक प्रकट केला. तसेच पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांसाठी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. तेलंगणातील हैदराबादमध्ये आग लागून मोठी जीवितहानी झाली. यामुळे दुःख झाले. ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले, त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो; अशी एक्स पोस्ट पंतप्रधान मोदींनी केली.

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या